शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

वनविभागाला अंधारात ठेवून बांबूची तोड आणि विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 4:26 AM

पण प्रत्यक्षात ग्रामसभांकडून याबाबतची माहितीच वनविभागाला दिली जात नसल्यामुळे वनविभागही बांबू निष्कासनाबद्दलच्या पुरेपूर माहितीपासून अनभिज्ञ आहे.

गडचिरोली : पेसा कायद्यांतर्गत ग्रामसभांना मिळालेल्या सामूहिक वनहक्काच्या पट्ट्यांमधील परिपक्वझालेला बांबू तोडून त्याची विक्री करण्यासाठी वनहक्क समित्यांना वन विभागाने मदत करावी, आणि किती बांबूची विक्री झाली याचा मासिक अहवाल सादर करावा, असे निर्देश अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी (एपीसीसीएफ) राज्यातील सर्व वनसंरक्षकांना दिले होते. पण प्रत्यक्षात ग्रामसभांकडून याबाबतची माहितीच वनविभागाला दिली जात नसल्यामुळे वनविभागही बांबू निष्कासनाबद्दलच्या पुरेपूर माहितीपासून अनभिज्ञ आहे.ग्रामसभांनी एक प्रकारे वनविभागाला बेदखल केल्याने जंगलाचा ºहास तर होत नाही ना?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वनहक्क कायद्यांतर्गत राज्यभरातील आदिवासीबहुल गावांना वनहक्क पट्ट्यांचे वितरण झाले आहे. या पट्ट्यांमधील वनोपज गोळा करण्याचे अधिकार संबंधित गावांना देण्यात आले आहेत. बांबू हा सुद्धा वनोपजामध्ये मोडत असल्याने बांबू तोडून त्याची विक्री करण्याचे अधिकार ग्रामसभांना मिळाले आहेत. मात्र नेमका कोणता बांबू तोडावा, तो कसा तोडावा याबाबतचे तांत्रिक ज्ञान स्थानिक नागरिकांना नाही. चुकीच्या पद्धतीने तोडणी झाल्यास बांबूचे जंगल नष्ट होण्याचा धोका आहे. तसेच अपरिपक्व बांबूला योग्य भाव व बाजारपेठ मिळत नसल्याचे वन विभागाच्या लक्षात आले. त्यामुळे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संधारण) यांनी ११ मार्च २०२० रोजी राज्यातील सर्व मुख्य वनसंरक्षक यांच्या नावाने पत्र निर्गमित करून ग्रामसभांना बांबू निष्कासनासाठी मदत करण्याचे निर्देश दिले. बांबूचे जंगल प्रामुख्याने गडचिरोली, चंद्रपूरमध्ये असल्याने या जिल्ह्यांसाठी हे पत्र महत्त्वाचे आहे.वनहक्क पट्ट्यांतर्गत गौण वनोपज गोळा करून विक्री करण्याचे अधिकार ग्रामसभांना आहेत. पण हे करताना ग्रामसभांनी वनविभागाची मदत आणि मार्गदर्शन घेणे अपेक्षित आहे. ते तांत्रिक मार्गदर्शन घेत नसल्याने काही अपरिपक्वबांबूचीही कटाई होते. ग्रामसभांनी आमची मदत घ्यावी यासाठी आमचा प्रयत्न असतो. मात्र ते मदत तर घेत नाहीच पण वनविभागाने मागितलेली बांबू निष्कासनाची माहितीही देत नाही. ग्रामसभांनी वनपरिक्षेत्र स्तरावर समन्वय ठेवल्यास त्यांचा फायदा होण्यासोबत अनावश्यक जंगलाची कटाई थांबेल.- एस. व्ही. रामाराव, मुख्य वनसंरक्षक, प्रादेशिक वनवृत्त गडचिरोली