शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

कुरखेडा बाजारात मिरचीची आवक वाढली

By admin | Updated: April 5, 2017 01:23 IST

उन्हाळ्याला सुरूवात होताच कुरखेडा आठवडी बाजारात सुकलेल्या लालमिरचीची आवक वाढण्यास सुरूवात झाली आहे.

१०० क्विंटल लाल मिरचीची विक्री : आठवडी बाजार फुलला; केशोरी मिरची विदर्भात प्रसिद्ध संदीप बावनकुळे   कुरखेडा उन्हाळ्याला सुरूवात होताच कुरखेडा आठवडी बाजारात सुकलेल्या लालमिरचीची आवक वाढण्यास सुरूवात झाली आहे. ग्राहक व विक्रेते यांच्या गर्दीमुळे कुरखेडा बाजार फुलून गेला आहे. कुरखेडा तालुक्यात केशोरी या जातीच्या मिरचीचे उत्पादन घेतले जाते. केशोरी मिरची संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. नागपूर जिल्ह्यातील भिवापूर नंतर कुरखेडा येथील केशोरी मिरचीचा बाजार प्रसिध्द आहे. कुरखेडा येथील मिरची गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, छत्तीसगड व आंध्रप्रदेशातही निर्यात केली जाते. केशोरी मिरचीची मोठी बाजारपेठ कुरखेडा येथे असल्याने तालुकाभरातील शेतकरी आपली मिरची बैलबंडी, दुचाकी, चारचाकी वाहन किंवा सायकलद्वारे कुरखेडा येथेच विक्रीसाठी आणतात. या ठिकाणी मिरचीची ठोक विक्री केली जाते. त्यामुळे इतर बाजारांच्या तुलनेत कुरखेडा येथे स्वस्त दरात मिरची उपलब्ध होत असल्याने ग्राहकही कुरखेडा येथूनच मिरची घेण्यास पसंती दर्शवितात. काही ग्राहक दुसऱ्या जिल्ह्यातील आपल्या नातेवाईकांसाठीही मिरची खरेदी करतात. त्यामुळे ग्राहकांची गर्दी वाढते. दर आठवडी बाजारात जवळपास १०० क्विंटल मिरचीची विक्री केली जाते, दर आठवड्याला लाखोंची उलाढाल मिरचीच्या माध्यमातून होते, अशी माहिती आठवडी बाजारात मिरची विकण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांनी दिली आहे. राज्यभरातील मिरची पावडर तयार करणाऱ्या कंपन्याही केशोरी मिरचीची खरेदी करतात. मागील दहा वर्षांत मिरचीचे क्षेत्र घटले १० वर्षांपूर्वी मालेवाडा, कढोली परिसरात शेकडो हेक्टरवर मिरचीची लागवड केली जात होती. मात्र दिवसेंदिवस या परिसरातील मिरचीचे क्षेत्र घटत चालले असल्याचे दिसून येत आहे. शेतकरीवर्ग मिरची ऐवजी मका, धान व इतर पिकांकडे वळला असल्याचे दिसून येत आहे. इतर पिकांच्या तुलनेत मिरची पिकाला मेहनत व खर्च अधिक आहे. मात्र त्या तुलनेत नफा मिळत नसल्याची माहिती बाजारात आलेल्या शेतकऱ्यांनी दिली आहे.