शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
2
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
3
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
4
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
6
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
7
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
8
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
9
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
10
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
11
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
12
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
13
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
14
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
15
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
16
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
17
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
18
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
19
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
20
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?

स्मशानभूमीत पार्थिवांच्या वेदना कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 00:00 IST

कठाणी नदी घाटावर नगर परिषदेने अंत्यविधीसाठी दोन प्रशस्त इमारती बांधल्या आहेत. इमारतींचे बांधकाम होऊन जवळपास दीड वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. तब्बल एक वर्षानंतर बोअर खोदली.

ठळक मुद्देआता वीजेची प्रतीक्षा : ५० हजार रुपयांच्या मंजुरीसाठी दीड वर्षाचा कालावधी
<p>लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कठाणी नदी घाटावर नगर परिषदेने अंत्यविधीसाठी दोन प्रशस्त इमारती बांधल्या आहेत. इमारतींचे बांधकाम होऊन जवळपास दीड वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. तब्बल एक वर्षानंतर बोअर खोदली. आता वीज नसल्याने बोअर मधून पाणी काढणे शक्य नाही. त्यामुळे स्मशानभूमी असूनही पावसात उघड्यावर दहनसंस्कार करावा लागत आहे. अजून किती दिवस हे सहन करायचे? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.गडचिरोली शहरातील बहुतांश अंत्यविधी कठाणी नदीच्या पात्रात पार पाडले जातात. अंत्यविधीनंतर जमा झालेली राख नदीच्या पाण्यात ढकलली जाते. त्याचबरोबर वापरली जाणारी पूजेची व इतर सामग्री नदीच्या पाण्यातच सोडली जाते. यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होते. पावसाळ्यात नदीत पाणी राहत असल्याने अंत्यविधी नदीकाठावरच आटोपावे लागत होते. त्यातही दिवसभर पाऊस असल्यास मृतदेहाला अग्नी देण्यास अडचण येत होती.या सर्व अडचणी लक्षात घेऊन नगर परिषदेने स्थानिक विकास निधीतून अंत्यविधी पार पाडण्यासाठी इमारत बांधण्याचा निर्णय घेतला. यावर लाखो रूपये खर्च झाले. इमारतींचे बांधकाम दीड वर्षापूर्वीच पूर्ण झाले. मात्र या ठिकाणी बोअरवेल व वीज व्यवस्था नसल्याचे कारण पुढे करून लोकार्पण थांबविण्यात आले. तब्बल एक वर्षांनतर म्हणजेच एप्रिल महिन्याच्या सुरूवातीला या ठिकाणी बोअरवेल खोदण्यात आली. बोअरवेलमध्ये पाणीपंपही टाकला आहे. बोअरवेल मधील पाणी बाहेर काढण्यासाठी वीज आवश्यक आहे. मात्र अजूनपर्यत वीज जोडणी करणे नगर परिषदेला शक्य झाले नाही.मागील एक महिन्यापासून सतत पाऊस पडत आहे. पावसामुळे पार्थिवावर अग्निसंस्कार करण्यात अडचणी निर्माण होत आहे. अगदी पाण्याजवळ पार्र्थिवावर अंतिम संस्कार करावे लागत आहेत. लाखो रूपयांची इमारत मात्र केवळ वीज नसल्यामुळे निरूपयोगी ठरत आहे.वीज जोडणी करण्यासाठी जास्तीत जास्त ५० ते ६० हजार रूपयांचा खर्च येणार आहे. एवढा निधी नगर परिषदेच्या सामान्य फंडातून खर्च करणे सहज शक्य असताना त्यासाठी दीड वर्षांचा कालावधी लागत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. बोअरवेल खोदण्यासाठी एक वर्ष लागले आता वीज पुरवठा करण्यासाठी किती दिवस लागेल, असा प्रश्न केला जात आहे.राखेच्या विल्हेवाटीसाठी पाणी आवश्यकचिता रचण्यासाठी लोखंडी कठडे तयार करण्यात आले आहेत. लोखंडी जाळ्यांवर लाकडे व पार्थीव ठेवले जाते. जळाल्यानंतर राख जमा होण्यासाठी खाली खड्डा तयार करण्यात आला आहे. या खड्डयाला छिद्र ठेवण्यात आले आहे. या छिद्रातून पुढे पाटाद्वारे राख नदीत जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तयार केलेल्या नालीद्धारे राख नदीत जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासते त्यामुळे स्मशानभूूमीसाठी बोअरवेल व वीज आवश्यक आहे. त्यामुळे जोपर्यंत वीज व पाण्याची व्यवस्था होणार नाही, तोपर्यंत या ठिकाणी अंत्यविधी करणे अशक्य होणार आहे.इमारतीच्या बांधकामाचे अंदाजपत्रक तयार करतानाच त्यात बोअरवेल व विजेच्या सुविधेचा समावेश असणे आवश्यक होते. मात्र यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी केवळ इमारत बांधली. इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आपण पुढाकार घेऊन स्मशानभूमीत बोअरवेल खोदली आहे. वीज जोडणीचे काम बाकी आहे. १५ आॅगस्टच्या पूर्वी या ठिकाणी वीज पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी नगर परिषद प्रयत्नरत आहे. नागरिकांना वन विभागाच्या डेपोतून लाकडे न्यावी लागतात. स्मशानभूमी परिसरात एक इमारत आहे. या इमारतीत लाकूड ठेवण्याची व्यवस्थाही केली जाईल. लाकडे खरेदी विक्रीचे काम एखाद्या खासगी यंत्रणेकडे सोपविले जाईल.- योगीता पिपरे, अध्यक्षनगर परिषद गडचिरोली