शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बाहेरून कापसाची आवक वाढणार ! आयात शुल्क लावण्यास ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ, शेतकऱ्यांमध्ये नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 19:47 IST

Gadchiroli : २०२१ मध्ये कापसाचे भाव १२ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले होते. आज मात्र ७हजार ७०० च्या दरम्यान भाव आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : केंद्र सरकारने कापसावरील ११ टक्के आयात शुल्क शून्य करण्याच्या निर्णयाला ३१ डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ दिली आहे. आधीच कापसाला समाधानकारक भाव मिळालेला नाही. त्यातच हा निर्णय घेतल्याने यंदाही कापसाचे भाव कमीच राहण्याची शक्यता आहे. सदर निर्णयाबाबत शेतकरी वर्गात नाराजी आहे.

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यंदा कापसाचे उत्पादन घटण्याची शक्यता शेतकरी वर्तवीत आहेत. कापसावरील ११ टक्के आयात शुल्क मागे घेण्याची मुदत सुरुवातीला ३० सप्टेंबर होती. त्यानंतर ही मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढविली आहे. २०२१ मध्ये कापसाचे भाव १२ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले होते. आज मात्र ७हजार ७०० च्या दरम्यान भाव आहे.

यंदा जिल्ह्यात १६ हजार ५२० हेक्टरवर पेरा

जिल्ह्यात यंदा १६ हजार ५२० हेक्टरवर कापूस पिकाचा पेरा आहे. शेतकऱ्यांनी कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. त्यामुळे उत्पादन चांगल्या प्रमाणात निघण्याची आशा शेतकऱ्यांना आहे.

कापसाचा आताच निकाल

केंद्र शासनाने आयात शुल्क कमी केल्याने बाहेरून कापसाची आवक वाढेल. परिणामी स्थानिक कापसाला योग्य भाव मिळणार नाही. त्याचे दर आपोआपच खाली घसरतील, असे एका व्यापाऱ्याने सांगितले.

सीसीआयवर मदार

चामोर्शी तालुक्यातील अनखोडा येथे मागील वर्षीपासून कापूस हमीभाव केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. सदर केंद्रावर कापूस विक्री करण्यासाठी शेतकरी नोंदणी सुरू झालेली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत नोंदणीची मुदत आहे.

आयात शुल्क माफीचे काय परिणाम होतात ?

परदेशातून कापूस आयात करताना त्यांना आयात शुल्क माफ केल्यास आवक वाढेल. कमी दरात बाहेरून कापूस उपलब्ध होईल. स्थानिक कापसाला योग्य भाव मिळणार नाही. याचे अनेक गंभीर परिणाम कापसाच्या बाजारपेठेतील दरावर होऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांना शासकीय केंद्रावरच कापसाची विक्री करावी.

यंदा कापसाला आहे इतका हमीभाव

यावर्षी कापसाला शासनाने मध्यम धाग्याचा कापूस ७ हजार ७१०, तर लांब धाग्याचा कापूस ८ हजार १०० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. शासकीय हमीभाव केंद्रांवर शेतकऱ्यांना हा भाव मिळेल.

"केंद्र शासनाने आयात शुल्क शून्य करण्याचा निर्णय घेतला असला तरी यावर्षी त्याचा स्थानिक मार्केटवर काहीच परिणाम होणार नाही. मात्र यावर्षी कापसाचे दर कमी राहण्याची शक्यता आहे. आवकनुसार बाजारात दर राहू शकतो. शेतकऱ्यांना माल सीसीआय केंद्रावर विक्री करणे सोयीचे राहील."- राजेश बोदलकर, जिनिंग चालक, आष्टी

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीcottonकापूसFarmerशेतकरीfarmingशेती