शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

छत्तीसगडमधील नक्षल कारवाया रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांमार्फत पत्रव्यवहार करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 16:51 IST

Home Minister Dilip Walse-patil : गृहमंत्री वळसे पाटील, महाराष्ट्रातील कामगिरीच्या आधारावर देणार टिप्स

ठळक मुद्देनागपूर दौऱ्यावर असलेल्या वळसे पाटील यांनी शुक्रवारी पोलीस-नक्षल्यांमध्ये झालेल्या मोठ्या चकमकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीला भेट दिली.

गडचिरोली : महाराष्ट्रात नक्षलविरोधी अभियान चांगल्या पद्धतीने राबविले जात असल्याने नक्षल चळवळ बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आली आहे, पण छत्तीसगडमध्ये नक्षली कारवायांना रोखणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांना काय करता येईल, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामार्फत छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

नागपूर दौऱ्यावर असलेल्या वळसे पाटील यांनी शुक्रवारी पोलीस-नक्षल्यांमध्ये झालेल्या मोठ्या चकमकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीला भेट दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस विभागाच्या कामगिरीचा आढावा घेऊन सरकारी पातळीवर पोलीस दलाच्या प्रलंबित असलेल्या अडचणीही जाणून घेतल्या. यावेळी अपर पोलीस महासंचालक (विशेष अभियान) संजय सक्सेना, गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) मनीष कलवानिया, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रलंबित कामे मार्गी लावणार- यावेळी बोलताना गृहमंत्र्यांनी गडचिरोली पोलीस दलाला विविध कामांसाठी लागणारा निधी, बांधकामे, संपर्क साधनांची सुविधा, दक्षिण गडचिरोली भागातील मोबाइल संपर्क सेवा, आदी प्रलंबित कामे शासनस्तरावरून सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.- गरीब, दुर्गम भागासाठी सरकार काही करत नाही, असा अपप्रचार करत नक्षलवादी गावकऱ्यांना त्यांच्या चळवळीत सहभागी करण्याचा प्रयत्न करतात. अलिकडे दुर्गम भागात अनेक विकासात्मक योजना पोलिसांमार्फतच राबविल्या जात आहे. यामुळे नक्षलवाद्यांना नागरिकांचे पाठबळ मिळणे कठीण झाले असल्याचे वळसे पाटील म्हणाले.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीDilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलPoliceपोलिसnaxaliteनक्षलवादीChief Ministerमुख्यमंत्री