शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

कोरोना टाकतोय कात, तरीही लोक बिनधास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 18:10 IST

गडचिरोली जिल्ह्यात आता सामाजिक संसर्गातून कोरोनाबाधित होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा स्थितीतही समाजात वावरताना मास्कचा वापर आणि शारीरिक अंतराच्या नियमांबाबत लोक गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देमास्कचा अल्प वापर ५० टक्केपेक्षा जास्त लोकांचे नाक-तोंड उघडेचकोरोनाच्या प्रसाराला आमंत्रण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जवळपास ४ ते ५ महिने कोरोनारुग्णांचा आकडा नियंत्रणात असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात आता सामाजिक संसर्गातून कोरोनाबाधित होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा स्थितीतही समाजात वावरताना मास्कचा वापर आणि शारीरिक अंतराच्या नियमांबाबत लोक गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत आता प्रशासनाने कडक भूमिका घेऊन कारवाई न केल्यास लोकांमधील बिनधास्तपणा वाढून कोरोनाचा सामाजिक संसर्ग आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे.

लॉकडाऊन शिथिल करताना प्रशासनाने अनेक नियमांचे पालन करण्याच्या अटी घातल्या आहेत. त्यात दुकानदारांनी स्वत: मास्कचा करण्यासोबतच ग्राहकांसाठी सॅनिटायझर ठेवण्याची सूचना आहे. याशिवाय दुकानांमध्ये येणाºया ग्राहकांनी मास्क लावूनच जायचे आहे. मास्क नसणाºया ग्राहकांना दुकानात प्रवेशच न देणे अपेक्षित आहे. पण कोणीही मास्क नाही म्हणून आलेल्या ग्राहकाला परत पाठवत नाही ही वस्तुस्थिती आहे.विशेष म्हणजे जिल्ह्यात १८ मे रोजी पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर पुढील दोन ते अडीच महिने बहुतांश रुग्ण हे बाहेरून आलेले आणि क्वॉरंटाईन सेंटरमध्ये असणारेच लोक होते. मात्र महिनाभरापासून सामाजिक संसर्गाचे प्रमाण हळूहळू वाढत आहे. गेल्या १५ दिवसात ते प्रमाण सर्वाधिक वाढले आहे. कात टाकलेल्या सापाप्रमाणे कोरोना व्हायरस आता चपळ होऊन कोणाच्याही हाती न लागता सर्वांना बाधा करण्यासाठी सज्ज झाला आहे.

जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गडचिरोली दीपक सिंगला यांनी जमावबंदी आणि टाळेबंदीसंदर्भात १ ते ३० सप्टेंबर या कालावधीसाठी अतिरिक्त नियमावली लागू केली आहे. त्यात सार्वजनिक ठिकाणी थुंकताना आढळल्यास किंवा नाका-तोंडावर विनामास्क किंवा रुमाल लावून न आढळल्यास २०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. हा दंड वसूल करण्याचा अधिकार संबंधित तहसीलदार, पोलीस निरीक्षक किंवा मुख्याधिकारी, नगर परिषद व नगर पंचायत यांना आहे.

विशेष म्हणजे या आदेशाचे पालन न करणारी व्यक्ती, संस्था किंवा समूह हे साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ तसेच भारतीय दंड संहिता १८६० नुसार शिक्षेस पात्र समजून नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहे. मात्र नियम मोडणाºयांविरूद्ध कारवाई होत नसल्याने ५० टक्के लोक या नियमांचे पालनच करत नसल्याचे दिसून येते. त्यांचा हा बिनधास्तपणा इतरांचे आरोग्य धोक्यात आणत आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या