कोरोनाला दूर ठेवायचे की दारूला? तुम्हीच ठरवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:39 IST2021-04-09T04:39:04+5:302021-04-09T04:39:04+5:30

डॉक्टरांच्या मते कोरोनाची लस घेण्याच्या काही दिवस आधी आणि काही दिवस नंतर मद्यप्राशन करणे टाळावे. त्यामुळे कोरोना लसीचा योग्य ...

Corona or alcohol? You decide | कोरोनाला दूर ठेवायचे की दारूला? तुम्हीच ठरवा

कोरोनाला दूर ठेवायचे की दारूला? तुम्हीच ठरवा

डॉक्टरांच्या मते कोरोनाची लस घेण्याच्या काही दिवस आधी आणि काही दिवस नंतर मद्यप्राशन करणे टाळावे. त्यामुळे कोरोना लसीचा योग्य परिणाम साधणे शक्य होते. जीवघेण्या कोरोनाला दूर ठेवण्यासाठी शौकिन लोक आता दारूला काही दिवसासाठी का होईना, दूर सारतील का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

देशी, विदेशी आणि सडवा जप्त

जिल्ह्यात छत्तीसगड, मध्यप्रदेशात वापरली जाणारी हलक्या दर्जाची देशी दारू येते. याशिवाय विशिष्ट ब्रॅण्डची विदेशी दारूही आयात होते. तसेच हातभट्टीच्या दारूसाठी मोहफूल सडवून त्याचे रसायन तयार केले जाते. मार्च महिन्यातील कारवायांवर नजर टाकल्यास देशी - विदेशी हातभट्टी दारूसह मोठ्या प्रमाणात हातभट्टीचा सडवाही ठिकठिकाणच्या कारवायांमध्ये जप्त करण्यात आला. एप्रिल महिन्यात या कारवायांमध्ये अजून भर पडत असल्याचे दिसून येते. अशा कितीही कारवाया झाल्या तरी मद्यशौकिन आपला शौक पूर्ण केल्याशिवाय राहात नाहीत.

(कोट)

लस घेण्याच्या किमान दोन दिवस आधी आणि लस घेतल्यानंतर दोन दिवस मद्यप्राशन करणे टाळले पाहिजे. कारण लसीमुळे मिळणारे औषध आणि मद्य प्राशनातून शरीरात जाणारे रासायनिक द्रव यांच्यात काही रासायनिक प्रक्रिया होऊ शकते. मद्यप्राशन केल्यास लसीनंतर शरीरावर झालेला परिणाम नेमका लसीमुळे झाला की, मद्यप्राशनामुळे हे लक्षात येणे कठीण होईल.

- डॉ. शशिकांत शंभरकर

जिल्हा आरोग्य अधिकारी

---

कोरोनाची लस घेतल्यानंतर किमान ७२ तास तरी मद्यप्राशन वर्ज्य करावे. नियमित मद्यप्राशन करणाऱ्याला तसे न केल्यास चिडचिडपणा किंवा इतर काही लक्षणे दिसतात. अशा लोकांसाठी कोरोनाचे लसीकरण हे आव्हानच आहे. पण, कोरोनाला दूर सारणे आधी महत्त्वाचे आहे. त्यामुळे सर्वांनी त्यासाठी सहकार्य करून लस घ्यावी.

- डॉ. बागराज धुर्वे

निवासी वैद्यकीय अधिकारी, जिल्हा रुग्णालय

Web Title: Corona or alcohol? You decide