शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
2
मस्कना दुकान बंद करून आफ्रिकेला परत जावे लागणार; ट्रम्प यांनी थेट दिली 'डॉज' मागे लावण्याची धमकी
3
IND vs ENG: जसप्रीत बुमराहला बाहेर बसवा, 'या' गोलंदाजाला संघात घ्या; अनुभवी ग्रेग चॅपल यांचा सल्ला
4
या जिल्ह्यात हार्ट अटॅकमुळे एका महिन्यात १८ तरुणांचा मृत्यू; सरकारने दिले चौकशीचे आदेश
5
वॉरेन बफे यांचा ‘२० पंच कार्ड नियम’ तुम्हाला करेल श्रीमंत ! वाचा सविस्तर
6
४४० व्होल्टचा झटका! स्मार्ट मीटरच्या नावाने स्कॅम; ६८ लाखांचं बिल पाहून वृद्धाची बिघडली प्रकृती
7
प्रियकरानं सांगितलं म्हणून नवरा सोडला, आता बंद घरात मिळाला तरुणीचा मृतदेह; कसा झाला दुर्दैवी अंत?
8
आवाज मराठीचा...! आम्ही फक्त आयोजक, जल्लोष तुम्ही करायचंय; राज-उद्धव यांचं एकत्रित आवाहन
9
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
10
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
11
डेट फंड म्हणजे काय? जिओ ब्लॅकरॉकने याच फंडमधून सुरुवात का केली? असा होतो गुंतवणूकदारांना फायदा!
12
ENG vs IND : टीम इंडिया बुमराह नावाच्या 'ब्रह्मास्त्र'चा वापर कसा करणार? असा आहे प्लॅन
13
इलॉन मस्क पुन्हा संतापले; विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या खासदारांना म्हणाले- तुमचा पराभव करणार...
14
MS Dhoni: धोनीचा 'Captain Cool' नावाच्या ट्रेडमार्कचा अर्ज कार्यालयाने स्वीकारला, पण अजूनही आहे एक अडथळा
15
Raymond Realty Stock Price: १००० रुपयांच्या वर लिस्टिंग; नंतर अपर सर्किट; Raymond समूहाच्या शेअरची जोरदार एन्ट्री
16
Shefali Jariwala Death: "त्यादिवशी तिने इंजेक्शन घेतलं होतं...", शेफाली जरीवालाच्या जवळच्या मैत्रिणीकडून मोठा खुलासा
17
व्यापार करारापूर्वीच भारताचा अमेरिकेला धोबीपछाड! ४ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं, ट्रम्प पाहतच राहिले
18
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
19
रात्री लवकर जेवल्याने खरंच कमी होतं का वजन? 'हे' आहे सत्य, लठ्ठपणाला 'असं' करा बाय बाय
20
Crime: महिला शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबत सेक्स; पुढं असं घडलं की... अख्खं आयुष्य झालं खराब!

आणखी चार जवानांना कोरोनाने ग्रासले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 05:01 IST

कोरोनामुक्त झालेल्या तीन जणांना सोमवारी दवाखान्यातून सुटी देण्यात आली. सुटीनंतरही त्यांना काही दिवस आपापल्या घरी होम क्वॉरंटाईन राहावे लागणार आहे. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.माधुरी किलनाके, अधिसेविका अनिता निकोडे, सहायक अधिसेवक शंकर तोगरे यांनी कोरोनामुक्त व्यक्तींना विलगीकरणाबाबतच्या सूचना केल्या.

ठळक मुद्देजिल्ह्यातील रुग्णसंख्या १११ : गडचिरोलीतील दोन भागासह भामरागड, अहेरी आणि चामोर्शी तालुक्यात प्रतिबंधित क्षेत्र

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देसाईगंज येथील कार्यरत असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) १९१ बटालियनच्या चार जवानांचे कोरोना अहवाल सोमवारी दुपारी पॉझिटिव्ह आले आहेत, तर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड कक्षातील तीन व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यात ५६ सक्रिय रूग्ण शिल्लक आहेत. त्यापैकी ४८ रूग्ण जिल्ह्यातील आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १११ वर पोहोचला आहे.१८ मे रोजी गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रूग्ण आढळून आला. त्यानंतर कोरोना रूग्णांची संख्या वाढतच गेली. मात्र रूग्ण वाढीचा दर अतिशय संथ होता. १८ मे ते ४ जुलैपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ७३ होती. मात्र ५ जुलै रोजी एकाच दिवशी ४१ रूग्णांची भर पडली. त्यातील ८ जणांची नोंद इतर जिल्ह्यात असल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित ३३ असल्याचे प्रशासनाकडून संध्याकाळी सांगण्यात आले. सोमवारी पुन्हा चार सीआरपीएफ जवानांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यासोबतच कोरोनावर उपचार घेत असलेल्या आरमोरी, चामोर्शी व कुरखेडा येथील प्रत्येकी एका व्यक्तीचे पुनर्तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ६२ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ८ रूग्णांची नोंद दुसऱ्या जिल्ह्यात झाली आहे.कोरोनामुक्त झालेल्या तीन जणांना सोमवारी दवाखान्यातून सुटी देण्यात आली. सुटीनंतरही त्यांना काही दिवस आपापल्या घरी होम क्वॉरंटाईन राहावे लागणार आहे. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.माधुरी किलनाके, अधिसेविका अनिता निकोडे, सहायक अधिसेवक शंकर तोगरे यांनी कोरोनामुक्त व्यक्तींना विलगीकरणाबाबतच्या सूचना केल्या.गडचिरोली जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी नागरिकांनी प्रशासनामार्फत केलेल्या सूचनांचे पालन करावे. अन्यथा संबंधिातांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. तसेच दुसºया जिल्ह्यातून विनापरवानगीने प्रवेश करणाऱ्यांवरही दंड ठोठावला जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला आहे.ब्रह्मपुरीतून येणाºयांना ई-पास देऊ नकादेसाईगंज : ब्रह्मपुरी उपविभागात कोरोना रूग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे वैद्यकीय, मयत, अतितातडीचा विषय वगळता इतरांना ब्रह्मपुरी येथून गडचिरोली जिल्ह्यात प्रवास करण्यास ई-पास देऊ नये, अशी मागणी गडचिरोलीच्या जिल्हाधिकाºयांनी चंद्रपूरच्या जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.189 जवान आले सुटीवरून परतदेसाईगंज येथे सध्या मुख्यालय असलेल्या सीआरपीएफच्या बटालियन क्रमांक १९१ चे १८९ जवान सुटीवरून परतले आहेत. त्यापैकी ४ जणांचे अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आले तर गेल्या दोन दिवसात आलेल्या ६ जणांचे अहवाल येणे बाकी आहे. उर्वरित सर्व १७९ जवानांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती बटालियन कमांडर प्रभाकर त्रिपाठी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. पॉझिटिव्ह आलेले ४ जवानांपैकी २ जण पश्चिम बंगालमधील, तर दोघे झारखंड व दिल्ली येथील आहेत. आलेले सर्वच जवान संस्थात्मक विलगिकरणात आहेत.सहा ठिकाणेप्रतिबंधितक्षेत्र घोषितकोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी गडचिरोली, देसाईगंज, भामरागड व अहेरी येथील काही भाग तसेच चामोर्शी तालुक्यातील मच्छली हे संपूर्ण गाव प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस