शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
2
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
16
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
17
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
18
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
19
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
20
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख

कोरोनामुळे ग्रामस्थांनी कारले विक्री केली बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 05:00 IST

परिसरातील शेतकरी मोहटोला किन्हाळा येथे ठोक स्वरूपात कारले विक्रीसाठी आणतात. व्यापाऱ्यांनी या गावामध्ये स्वत:चे वजनकाटे लावले आहेत. कारले खरेदी-विक्रीसाठी शेतकरी व व्यापाऱ्यांची मोठी गर्दी उसळते. खरेदी-विक्री करताना शारीरिक अंतर पाळले जात नाही.

ठळक मुद्देकोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारी; गावात झाली होती व्यापाऱ्यांची गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कमोहटोला/किन्हाळा : कारले खरेदी करण्यासाठी मोहटोला, किन्हाळा या गावांमध्ये व्यापाऱ्यांची मोठी गर्दी उसळत असल्याने कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका लक्षात घेऊन ग्रामस्थांनी कारले विक्रीचे वजनकाटे बंद पाडले आहेत. त्यामुळे कारले उत्पादक शेतकऱ्यांची मोठी पंचाईत झाली आहे.मोहटोला, किन्हाळा, विहीरगाव, चिखली तूकुम, रिठ, डोंगरगाव (हलबी), फरी, झरी, उसेगाव, पिंपळगाव हलबी, पोटगाव या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात कारल्यांचे उत्पादन घेतले जाते. येथील कारले नागपूर, भंडारा, भिलाई, रायपूर व अन्य शहरांमध्ये पाठविले जातात. परिसरातील शेतकरी मोहटोला किन्हाळा येथे ठोक स्वरूपात कारले विक्रीसाठी आणतात. व्यापाऱ्यांनी या गावामध्ये स्वत:चे वजनकाटे लावले आहेत. कारले खरेदी-विक्रीसाठी शेतकरी व व्यापाऱ्यांची मोठी गर्दी उसळते. खरेदी-विक्री करताना शारीरिक अंतर पाळले जात नाही.नागपूर व इतर कोरोना प्रभावित शहरांमध्ये जाऊन वाहने परत येतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेऊन ग्रामस्थांनी मोहटोला किन्हाळा येथे कारले व इतर भाजीपाल्याची खरेदी-विक्री करू न देण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यामुळे कारले उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.प्रामुख्याने उन्हाळ्यात कारल्याचे उत्पादन घेतले जाते. आत्तापर्यंत विकलेल्या कारल्यांमधून शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्च निघाला. कारल्यांचे उत्पादन पावसाळ्यापर्यंत चालते. यानंतरच्या विक्रीतून नफा मिळणार होता. मात्र खरेदी-विक्रीवर बंदी आणल्याने नफ्यापासून शेतकºयांना वंचित राहावे लागणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.विक्रीचा प्रश्न गंभीरया परिसरातील शेतकरी दर दिवशी शेकडो क्विंटल कारल्यांचे उत्पादन करतात. एवढ्या मोठ्या प्रमाणातील कारले केवळ गडचिरोली जिल्ह्यात विकणे कठिण आहे. त्यामुळे कारले विक्रीचा प्रश्न गंभीर झाला आहे. शारीरिक अंतर ठेवून कारल्यांची विक्री केली जाईल. तसेच कोरोना संदर्भातील नियम पाळले जातील. मात्र कारले विक्री करू द्यावी, अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.निर्यात थांबल्याने भाजीपाला स्वस्तगडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील उत्पादित भाजीपाला व पालेभाज्याची निर्यात कोरोनाच्या संचारबंदीमुळे जिल्ह्याबाहेर तसेच मोठ्या शहरात गेल्या महिनाभरापासून होत नसल्याचे दिसून येते. परिणामी उत्पादक शेतकºयांना भाजीपाला जिल्ह्यातच विकावा लागत आहे. परिणामी शेतकºयांना योग्य भाव मिळत नसल्याचे दिसते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या