शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
3
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
4
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
5
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
6
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
8
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
9
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
10
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
11
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
12
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
13
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
14
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
15
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
16
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
17
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
18
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
19
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
20
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न

लोकवर्गणीतून किचन शेडचे बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 5:00 AM

आष्टी येथील साई मंदिराच्या सभागृहाला लागून २५ बाय ११ आकाराच्या जागेवर सदर किचन शेडचे २७५ चौरस मीटर फुटाचे बांधकाम सुरू आहे. सदर किचन शेडच्या कामासाठी अस्मिता भिमनवार व मिलींद पाटील यांनी मोलाची आर्थिक मदत केली आहे. सामाजिक कार्यकर्ते संजीव पंदीलवार यांनी स्वत: बांधकामाचा खर्च देण्याचे कबूल केले असून त्यांच्या सहकार्याने किचन शेडचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच देवस्थान कमिटीच्या सर्व सदस्यांचे या कार्यासाठी योगदान मिळत आहे.

ठळक मुद्देआष्टी येथील साई मंदिरात एक लाख रुपयांतून बांधकाम प्रगतीपथावर

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : येथील साई शिक्षक कॉलनीमधील साई मंदिरामध्ये लोकवर्गणीच्या पैशातून किचन शेड बांधकामाला सुरूवात करण्यात आली आहे. या कामाला एक लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर येथे येणाऱ्या भाविकांसाठी सदर किचन शेड अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.आष्टी येथील साई मंदिराच्या सभागृहाला लागून २५ बाय ११ आकाराच्या जागेवर सदर किचन शेडचे २७५ चौरस मीटर फुटाचे बांधकाम सुरू आहे. सदर किचन शेडच्या कामासाठी अस्मिता भिमनवार व मिलींद पाटील यांनी मोलाची आर्थिक मदत केली आहे. सामाजिक कार्यकर्ते संजीव पंदीलवार यांनी स्वत: बांधकामाचा खर्च देण्याचे कबूल केले असून त्यांच्या सहकार्याने किचन शेडचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच देवस्थान कमिटीच्या सर्व सदस्यांचे या कार्यासाठी योगदान मिळत आहे.सदर मंदिराजवळ विहिरीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असून याचा खर्च गजानन ताजने व मिलींद पाटील यांनी उचलला आहे. सर्वधर्म समभावाचे प्रतीक असलेल्या या साई मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात. याशिवाय साक्षगंध, वाढदिवस व इतर छोटे-मोठे कार्यक्रमही आयोजित केले जातात. किचन शेडचे काम पूर्ण झाल्यानंतर विविध कार्यक्रमानिमित्त करण्यात येणाºया स्वयंपाकाची अडचण मार्गी लागणार आहे. येथे प्रशस्त किचन शेड तयार होत असून हे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. शनिवारला साई मंदिराचा स्थापन दिवस साजरा करण्यात आला. सदर साई मंदिर आष्टी व परिसरातील भाविकांसाठी श्रद्धास्थान बनले आहे.कोरोनामुळे मंदिर कुलूपबंदचकोरोनाच्या संचारबंदीच्या काळात चामोर्शी तालुक्यासह जिल्हाभरातील सर्व मंदिर कुलूपबंद आहेत. मंदिरात गर्दी होऊन कोरोनाचा संसर्ग वाढू नये, या हेतूने आष्टी येथील साई मंदिर कुलूपबंद ठेवण्यात आले आहे. शेड बांधकामासाठी कामगार येथे काम करतात. मात्र भाविकांसाठी या मंदिरात प्रवेश नाही. त्यामुळे आष्टी शहर व परिसरातील साई भक्तांना घरीच पूजाअर्चा करावी लागत आहे. चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडा येथील मंदिर सुद्धा कुलूपबंद आहे. 

टॅग्स :Socialसामाजिक