लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : नगर पंचायतीची विषय समिती सभापतीपदाची निवडणूक शनिवारी घेण्यात आली. या निवडणुकीत काँग्रेस-शिवसेनेने आघाडी घेत तिन्ही समित्यांवर वरचष्मा राखला. मात्र बहुमताने बांधकाम समिती सभापती पद भाजपने राखण्यात यश मिळविले.कुरखेडा येथे काँग्रेस-सेना व भाजपा-राकाँ अशी अभद्र युती करण्यात आलेली आहे. शनिवारी घेण्यात आलेल्या विषय समितीच्या निवडणुकीत आरोग्य व स्वच्छता समितीवर काँग्रेसचे मनोज सिडाम यांची फेरनिवड करण्यात आली तर पाणीपुरवठा समिती व महिला व बालकल्याण समितीवर शिवसेनाचे अनुक्रमे अनिता बोरकर व चित्रा गजभिये यांची वर्णी लागली. मात्र बांधकाम समिती हे खाते बहुमताने उपाध्यक्ष तथा प्रभारी नगराध्यक्ष रवींद्र्र गोटेफोडे यांच्याकडे सोपविण्यात आले.निवडणूक निकाल घोषित होताच दोन्ही गटाकडून फटाके फोडत व गुलाल उधळत जल्लोष साजरा करण्यात आला. याप्रसंगी सेना-काँग्रेसकडून शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र सिंह चंदेल, माजी जि.प.उपाध्यक्ष जीवन नाट, तालुका काँग्रेस अध्यक्ष जयंत हरडे, सेना तालुका अध्यक्ष आशीष काळे, पं.स.सभापती गिरधर तितराम, जि.प.सदस्य प्रल्हाद कराडे, प्रभाकर तुलावी, माजी नगराध्यक्ष डॉ.महेंद्रकुमार मोहबंसी, पुंडलिक देशमुख, सोनू भट्टड, आशा तुलावी, उसमान खा पठान, भाजपा-राकाँ गटाकडून भाजपा जिल्हा सचिव विलास गावंडे, तालुका अध्यक्ष राम लांजेवार, प्रभारी नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे, गटनेता प्रा.नागेश फाये, नगरसेवक अॅड.उमेश वालदे, बबलू हुसैनी, शाहेदा मुघल, स्वाती नंदनवार, रामहरी उगले, नंदिनी दखने, अर्चना वालदे, दीपाली देशमुख व कार्यकर्ते उपस्थित होते. पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, सहायक अधिकारी म्हणून मुख्याधिकारी मयूर भुजबळ यानी काम पाहिले. निवडीनंतर जल्लोष झाला.नगर पंचायतमध्ये प्रभारी नगराध्यक्ष पदावर भाजपचा कब्जा आहे. मात्र सर्व सभापती विरोधी काँग्रेस-सेना युतीकडे असल्याने शहरातील विकास कामांवर याचा परिणाम होणार नाही. याकरिता सर्व पदाधिकाऱ्यांनी पक्षीय दुराभिमान बाजूला ठेवत शहर विकासाला प्राधान्य देतील, अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
काँग्रेस-सेनेचा वरचष्मा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 01:16 IST
नगर पंचायतीची विषय समिती सभापतीपदाची निवडणूक शनिवारी घेण्यात आली. या निवडणुकीत काँग्रेस-शिवसेनेने आघाडी घेत तिन्ही समित्यांवर वरचष्मा राखला. मात्र बहुमताने बांधकाम समिती सभापती पद भाजपने राखण्यात यश मिळविले.
काँग्रेस-सेनेचा वरचष्मा
ठळक मुद्देकुरखेडा सभापतीपद निवडणूक : बांधकाम समिती मात्र भाजपकडे