शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
7
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
8
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
9
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
10
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
11
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
12
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
13
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
14
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
15
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
16
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
17
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
18
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
19
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
20
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...

समितीपुढे वाचला रिक्तपदांचा पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2019 10:32 PM

आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विविध योजनांच्या अंमलबजावणीत रिक्त पदांचा मोठा अडथळा असल्याची बाब बुधवारी राज्यस्तरीय आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांच्या लक्षात आली. जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये दौरा करून त्यांनी समस्यांचे मूळ जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देसोईसुविधांचा अभाव : भेटीतून आदिवासी समितीने जाणली तथ्ये

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विविध योजनांच्या अंमलबजावणीत रिक्त पदांचा मोठा अडथळा असल्याची बाब बुधवारी राज्यस्तरीय आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांच्या लक्षात आली. जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये दौरा करून त्यांनी समस्यांचे मूळ जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अनेक ठिकाणी रिक्त पदांमुळे योजनांच्या अंमलबजावणीत अडथळे येत आहेत. याशिवाय अपेक्षित सोईसुविधांचा अभाव असून त्यात सुधारणा करण्यास वाव असल्याची नोंद त्यांनी आपल्या निरीक्षणात घेतली.विकास विभागाचे सहायक आयुक्त डॉ.संदीप राठोड, आदिवासी प्रकल्प अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ.इंदुराणी जाखड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रुडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, उपमुख्य कार्यपालन अधिकारी (महिला व बालविकास) आर.एल. लामतुरे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुरेश पेंदाम आणि इतर अधिकारीगण या दौऱ्यात उपस्थित राहून आपापल्या विभागाची माहिती देत होते.सकाळी ८.३० वाजता बोदली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रापासून या भेटींना सुरूवात झाली. चातगावच्या अंगणवाडीतील मुले चांगली प्रशिक्षित होती. पण इमारतीच्या गळक्या छताला तात्पुरते आवरण लावले होते. सोडे येथील अंगणवाडीत मात्र अमृत आहाराचे कडधान्य पोहोचलेच नव्हते. या गावातील रेशन कार्डवर धान्य पुरवठ्यातही गडबड असल्याचे निदर्शनास आले.मेंढा या गावात देवाजी तोफा, प्रा.कुंदन दुफारे, ग्रामसेवक आर.एच.कुनघाडकर यांनी त्यांचे स्वागत करून उपक्रमांची माहिती दिली. याशिवाय गावाजवळच्या वनतलावातील गाळ काढण्याची मागणी केली.६० ते ७० टक्के मुली अ‍ॅनिमियाग्रस्तसोडे या गावातील शासकीय कन्या आश्रमशाळेतील महिला वैद्यकीय अधिकाºयाने ६० ते ७० टक्के मुली अ‍ॅनिमियाग्रस्त असल्याचे सांगितले. त्यांचे हिमोग्लोबिन ९ ते १० टक्क्यांपेक्षा जास्त नाही. त्यांना अतिरिक्त पोषक घटक दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. परंतू त्या मुली आता वसतिगृहात नसल्याचे सांगण्यात आले. यावेळी पंडित यांनी मुलींची थायलेसेमिया तपासणीही करण्याची सूचना केली.रोजगाराअभावी उद्भवले अनेक प्रश्नकुपोषण, आरोग्य हे प्रश्न रोजगाराअभावी निर्माण झाले आहेत. गर्भवती किंवा स्तनदा मातांना सध्या अमृत आहार योजनेतून घरी शिजवण्यासाठी दिले जात असलेले कडधान्य ती एकटीच खात नाही. त्यात घरातील सर्वच लोक वाटेकरी होतात. परिणामी त्या आहारातून तिला आवश्यक असलेले पोषक घटक पुरेशा प्रमाणात मिळू शकत नाही. संपूर्ण कुटुंबालाच पोषक आहाराची गरज आहे. पण आर्थिक स्थितीमुळे त्यांना ते शक्य होत नाही, असे निरीक्षण समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी नोंदविले.