शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

गाव विकासासाठी एकत्र या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 11:23 PM

राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन चांगले काम करावे, चांगल्या कामातून ग्रामस्थांनी गावाचा विकास साधावा, असे आवाहन खा. अशोक नेते यांनी केले.

ठळक मुद्देखासदारांचे आवाहन : कुनघाडात पाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन

आॅनलाईन लोकमततळोधी (मो.) : राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन चांगले काम करावे, चांगल्या कामातून ग्रामस्थांनी गावाचा विकास साधावा, असे आवाहन खा. अशोक नेते यांनी केले.कुनघाडा (रै.) ग्रामपंचायत आवारात कुनघाडा (रै.), नवेगाव (रै.) व तळोधी (मो.) या तीन गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या भूमीपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते उद्घाटक बोलत होते. यावेळी मंचावर सहउद्घाटक आ. डॉ. देवराव होळी तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर, आ. कृष्णा गजबे, माजी जि.प. अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, नगराध्यक्ष योगीता पिपरे, सरपंच अविनाश चलाख, पं.स. सभापती आनंद भांडेकर, पं. स. सदस्य सुभाष वासेकर, नगरसेवक प्रमोद पिपरे, तळोधीच्या सरपंच माधुरी सुरजागडे, नामदेव उडाण, जि.प. सदस्य रमेश बारसागडे, बाबुराव कुकुडे, संतोष भांडेकर, जलप्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता संजय वाघ, श्रावण भांडेकर, उपसरपंच दुधबळे, मीना कोडाप, दिलीप चलाख आदी मान्यवर उपस्थित होते.शनिवारी खा. अशोक नेते यांच्या हस्ते प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन ग्रामपंचायतीच्या आवारात करण्यात आले. पुढे बोलताना खा. नेते म्हणाले, सरकारच्या निर्देशानुसार ग्राम आराखडा पाच वर्षांचा बनवून त्यानुसार विकास कामे होऊ शकतात. त्यादृष्टीने सरकारचे प्रयत्न असून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पाच बंधारे पूर्णत्वास आले असून यापुढेही सिंचन सुविधेवर भर राहणार आहे. वन विभागाच्या अटी दूर होताच रेल्वे व राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होणार आहे, असे नेते यांनी सांगितले. सदर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत वॉटर फिल्टर सुविधेमुळे तीन गावातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळणार आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाबाबत विद्यमान केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अभियंता संजय वाघ, संचालन जि.प. सदस्य रमेश बारसागडे यांनी केले तर आभार अभियंता अभय कोतपल्लीवार यांनी मानले. कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व नागरिक उपस्थित होते.