शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
3
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
4
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
5
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
6
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
7
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
8
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
9
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
10
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
11
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
12
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
13
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
14
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
15
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
16
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
17
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
18
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
19
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
20
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई

जिल्हाधिकाऱ्यांकडून अनलाॅकचे आदेश जाहीर; बाजारपेठ उघडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 05:00 IST

स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्था यांच्या बैठका व निवडणुकांबाबत- कोविड-१९ निर्देशांचे अधीन राहून सामाजिक अंतर राखून ५० लोकांच्या मर्यादेत सुरू ठेवण्याची मुभा असेल. सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत प्रत्यक्ष बांधकामस्थळावर कामास मुभा असेल; परंतु कामगारांना दुपारी चार वाजल्यानंतर काम करण्याची परवानगी नसेल. ई-कॉमर्स ‘साहित्य व सेवा’- नियमितपणे सुरू असतील.

ठळक मुद्देसाेमवार ते शुक्रवार दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार सर्व दुकाने

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : प्रत्येक जिल्ह्यातील काेराेनाची स्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने राज्यातील जिल्ह्यांची पाच स्तरांमध्ये विभागणी केली. त्यामध्ये गडचिराेली जिल्हा तिसऱ्या स्तरावर आहे. राज्य शासनाने याबाबतची नियमावली रविवारी जाहीर केली. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी अनलाॅकसंदर्भात नवीन आदेश जाहीर केले आहेत. विशेष म्हणजे गडचिराेली जिल्हा तिसऱ्या स्तरावर असल्याने काय सुरू राहणार व काय बंद राहणार याबाबतचे वृत्त ‘लाेकमत’ने रविवारीच प्रकाशित केले.जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवेत मोडणारी दुकाने सोमवार ते रविवार सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा असेल. अत्यावश्यक सेवा वगळून इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहतील. रेस्टॉरंट, उपाहारगृहे सोमवार ते शुक्रवारी सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत ५० डायनिंग क्षमतेसह सुरू ठेवण्याची मुभा असेल. तथापि इतर वेळेस पार्सल / होम डिलिव्हरी सुरू ठेवता येईल. सार्वजनिक स्थळे, खुले मैदान, इ. सार्वजनिक स्थळे, खुले प्रेक्षागृह, मॉर्निंग वॉक, सायकलिंग हे सर्व दिवस सकाळी पाच ते नऊ वाजेपर्यंत सुरू असेल. खासगी कार्यालये सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा असेल. खासगी / शासकीय कार्यालयातील उपस्थिती ५० ठेवता येईल. याहून अधिक उपस्थिती गरजेची असेल तर संबंधित विभागप्रमुखाने जिल्हाधिकारी गडचिरोली यांची पूर्वपरवानगी घ्यावी. सोमवार ते शुक्रवार सकाळी पाच ते नऊ वाजेपर्यंत तर सायंकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत आऊटडोअर क्रीडाविषयक बाबी सुरू ठेवण्याची मुभा असेल. सामाजिक / सांस्कृतिक / मनोरंजन कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार  सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत कोविड-१९ निर्देशांच्या अधीन राहून सामाजिक अंतर राखून ५० लोकांच्या मर्यादेत सुरू ठेवण्याची मुभा असेल.स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्था यांच्या बैठका व निवडणुकांबाबत- कोविड-१९ निर्देशांचे अधीन राहून सामाजिक अंतर राखून ५० लोकांच्या मर्यादेत सुरू ठेवण्याची मुभा असेल. सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत प्रत्यक्ष बांधकामस्थळावर कामास मुभा असेल; परंतु कामगारांना दुपारी चार वाजल्यानंतर काम करण्याची परवानगी नसेल. ई-कॉमर्स ‘साहित्य व सेवा’- नियमितपणे सुरू असतील.सायंकाळी पाच ते सकाळी सात वाजेपर्यंत पाचहून अधिक लोकांना एकत्र जमण्यास मज्जाव असेल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था १०० टक्के क्षमतेसह सुरू ठेवता येणार; तथापि सदर वाहनांमध्ये आसनव्यवस्थेव्यतिरिक्त उभ्याने प्रवासी नेण्यास मनाई असेल. 

सलून व ब्यूटी पार्लर सुरू-व्यायामशाळा, सलून, ब्युटीपार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्स इ. सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत कोविड-१९ निर्देशांच्या अधीन राहून ५० टक्के क्षमतेसह सोमवार ते शुक्रवार सुरू ठेवण्याची मुभा असेल तथापि सदर ठिकाणांमध्ये एसीचा वापर करता येणार नाही.

कृषीविषयक सेवा, दुकाने- सोमवार ते रविवार सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहतील.

विवाहासाठी ५० लाेकांची उपस्थिती

- कोविड-१९ निर्देशाचे अधीन राहून सामाजिक अंतर राखून एकूण ५० लोकांच्या मर्यादेत विवाह पार पाडण्याची मुभा असेल. तथापि याचे उल्लंघन केल्यास रु. ५० हजार रुपयांचा दंड व संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल. यापूर्वी विवाहासाठी केवळ २५ नागरिकांच्या उपस्थितीची परवानगी हाेती.- कोविड-१९ निर्देशाचे अधीन राहून एकूण २० लोकांच्या मर्यादेत अंत्यविधीचा कार्यक्रम पार पाडण्याची मुभा असेल.

जिल्हा बंदीचे नियम शिथिलकेवळ पाचव्या स्तरात असलेल्या जिल्ह्यात जाण्यासाठीच इ-पास आवश्यक राहणार आहे. राज्यातील एकही जिल्हा पाचव्या स्तरात नाही. त्यामुळे राज्यभरात इ-पासशिवाय प्रवेश करता येणार आहे. नागरिकांना आता चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गाेंदिया या जिल्ह्यांमध्ये इ-पास शिवाय जाता येणार आहे. दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी व तेथून येण्यासाठी यापूर्वीच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्न