शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

गडचिरोलीच्या दुर्गम भागात मुख्यमंत्र्यांनी साजरी केली दिवाळी; पोलीस जवानांसह नागरिकांना साहित्य वाटप

By मनोज ताजने | Updated: October 25, 2022 15:23 IST

मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते धोडराज पोलीस मदत केंद्राच्या नवीन इमारतीचे उद्घाटन

भामरागड (गडचिरोली) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (दि.२५) दुपारी भामरागड तालुक्यातील दुर्गम अशा धोडराज पोलीस मदत केंद्राच्या आवारात आदिवासी नागरिक आणि पोलीस जवानांना साहित्य, फटाके आणि फराळ वाटप करून त्यांच्यासोबत संवाद साधत दिवाळी साजरी केली. 

नागपूर विमानतळावरून ना. शिंदे हेलिकॉप्टरने थेट धोडराज येथे पोहोचले. यावेळी जिल्हाधिकारी संजय मीणा, पोलीस महासंचालक रजनीश शेठ, पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अनुज तारे, शिवसेनेचे (बाळासाहेबांची शिवसेना) विदर्भ समन्वयक किरण पांडव आदींनी त्यांचे स्वागत केले. 

नागरिकांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले, नक्षलवाद्यांमुळे विकासात्मक कामांत अडथळे येत आहेत. त्यामुळे दुर्गम भागातील नागरिकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी नक्षलवाद संपवणे गरजेचे आहे. मी या जिल्ह्याचा पालकमंत्री असतानाही दुर्गम भागात येत होतो. त्यामुळे तुमच्याबद्दल मला आस्था आहे. तुमच्या विविध समस्यांचीही मला जाणीव आहे. त्या दूर करण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांनादेखील मदतीची भूमिका; मुख्यमंत्री शिंदे म्हणाले..

नक्षलविरोधी अभियानासाठी घरापासून शेकडो किलोमीटर लांब राहून आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकारी-जवानांना घरच्या लोकांसोबत दिवाळी साजरी करता येत नाही. त्यामुळेच त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी मी आलो असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धोडराज पोलीस मदत केंद्राच्या नवीन इमारतीचे उद्घाटनही करण्यात आले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :SocialसामाजिकDiwaliदिवाळी 2022Eknath Shindeएकनाथ शिंदेGadchiroliगडचिरोलीPoliceपोलिस