शहरं
Join us  
Trending Stories
1
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
2
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
3
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
4
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
5
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
6
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
7
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
8
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
9
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
10
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
11
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
12
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
13
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
14
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
15
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
16
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
17
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
18
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
19
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
20
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!

एलईडी बल्बच्या प्रकाशाने उजळणार शहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 22:41 IST

राज्याचा नगर विकास विभाग व गडचिरोली नगर पालिका प्रशासनाच्या पुढाकाराने शहरातील प्रमुख तसेच अंतर्गत मार्गावरील खांबावर एलईडी बल्ब बसविण्यात येणार आहेत. याबाबतचे संपूर्ण नियोजन पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले असून संपूर्ण शहरभर जवळपास चार हजार एलईडी बल्ब लावले जाणार आहेत. बल्ब लावण्याचे काम मंगळवारपासून सुरू होणार आहे. हे काम पूर्ण झाल्यावर शहरातील पथमार्ग एलईडी बल्बच्या लख्ख प्रकाशाने उजळणार आहे.

ठळक मुद्देचार हजार बल्ब लागणार : वीज बिल बचतीसाठी नगर विकास विभाग व पालिकेचा पुढाकार

दिलीप दहेलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्याचा नगर विकास विभाग व गडचिरोली नगर पालिका प्रशासनाच्या पुढाकाराने शहरातील प्रमुख तसेच अंतर्गत मार्गावरील खांबावर एलईडी बल्ब बसविण्यात येणार आहेत. याबाबतचे संपूर्ण नियोजन पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले असून संपूर्ण शहरभर जवळपास चार हजार एलईडी बल्ब लावले जाणार आहेत. बल्ब लावण्याचे काम मंगळवारपासून सुरू होणार आहे. हे काम पूर्ण झाल्यावर शहरातील पथमार्ग एलईडी बल्बच्या लख्ख प्रकाशाने उजळणार आहे.नगर विकास विभागाने या संदर्भात ४ जून २०१८ रोजी नवा शासन निर्णय निर्गमित केला. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी ऊर्जा बचतीसाठी एलईडी पथदिवे बसविण्यासाठी ईईएसएल या कंपनीशी करारनामा केला आहे. ईईएसएलच्या माध्यमातून एस्को तत्वावर एलईडी पथदिवे बसविण्याच्या कामात स्थानिक स्वराज्य संस्थेस सुरूवातीला कोणतीही भांडवली गुंतवणूक करावी लागणार नाही.त्यामुळे एलईडी पथदिवे बसविण्यासाठी शासनाच्या निधीसोबतच चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून अथवा स्वनिधीतून कोणताही भांडवली खर्च करण्यास प्रतिबंध राहिल, असे नगर विकास विभागाच्या शासन निर्णयात नमूद आहे.सदर एलईडी बल्ब लावण्यासाठीच्या कामाचा करारनामा गडचिरोली पालिकेच्या वतीने संबंधित ईईएसएल या कंपनीशी करण्यात आला आहे. गडचिरोली पालिकेच्या हद्दित १३ प्रभाग असून २५ वार्ड आहेत. सर्व प्रभाग मिळून वार्डावार्डात एकूण ३ हजार ६६३ एलईडी बल्ब लावण्यात येणार आहे.यामध्ये प्रभाग क्रमांक १ मधील सर्व खांबांवर २०८, प्रभाग क्रमांक २ मध्ये ३२२, प्रभाग क्रमांक ३ मध्ये २५३, प्रभाग क्रमांक ४ मध्ये १९४, प्रभाग क्रमांक ५ मध्ये ५५२, प्रभाग क्रमांक ६ मध्ये २२०, प्रभाग क्रमांक ७ मध्ये २४५, प्रभाग क्रमांक ८ मध्ये १२०, प्रभाग क्रमांक ९ मध्ये २००, प्रभाग क्रमांक १० मध्ये २५८, प्रभाग क्रमांक ११ मध्ये ६१५ आणि प्रभाग क्रमांक १२ मध्ये सर्व खांबावर ४७६ एलईडी बल्ब लावण्यात येणार आहे.विजबिलापोटी आर्थिक बचत व्हावी. अवाजवी विजबिलाचा नगर पालिकेवर भार पडू नये, यासाठी राज्याच्या नगर विकास विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत सर्व शहरांमध्ये एलईडी बल्ब बसविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एलईडी बल्बच्या वापराने विजबिल निम्म्यापेक्षा कमी होत असल्याचा अनुभव आहे.देखभाल दुरूस्तीची जबाबदारी कंपनीवरशहरातील खांबांवर एलईडी पथदिवे बसविण्याचे काम शासन स्तरावरून ईईएसएल कंपनीला सोपविले आहे. करारनामा व इतर सर्व प्रशासकीय कार्यवाही पूर्ण झाली असून हे बल्ब लावण्याचे काम मंगळवारपासून सुरू होणार आहे. बल्बच्या देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी पाच वर्षापर्यंत संबंधित कंपनीवर सोपविण्यात आली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे पालिकेचा वीज पुरवठा व देखभाल दुरूस्तीसाठी दरवर्षी येणारा लाखो रूपयांचा खर्च वाचणार आहे. आता नगर पालिकेच्या वतीने केवळ आवश्यक त्या ठिकाणी नवीन खांब उभारून वीज पुरवठा जोडण्याचे काम निविदा प्रक्रिया राबवून करण्यात येणार आहे.१३४ खांबावर राहणार २५१ बल्बशहराच्या मुख्य मार्गावरील वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी पालिका प्रशासनाच्या वतीने काही वर्षापूर्वी दुभाजक उभारण्यात आले. आरमोरी, चामोर्शी, धानोरा व चंद्रपूर या चारही मार्गावर एकूण १३४ खांब आहेत. काही खांबावर एक तर काही खांबावर दोन बल्बची व्यवस्था करण्यात आली आहे. या १३४ खांबावर एकूण २५१ एलईडी बल्ब बसविण्यात येणार आहे.हायमास्टवर १९० वॅटचे बल्बगडचिरोली शहरात मोक्याच्या व वर्दळीच्या ठिकाणी मिळून एकूण सहा हायमास्ट लाईट बसविण्यात आले आहेत. या हायमास्टवर १९० वॅटचे एलईडी बल्ब बसविण्यात येणार आहेत. यामध्ये इंदिरा गांधी चौक, बसस्थानक चौक, रेड्डी गोडाऊन चौक, कारगिल चौक, आयटीआय चौक व कॉम्प्लेक्स भागातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसराचा समावेश आहे. हे सहाही ठिकाणचे चौक एलईडी बल्बने प्रकाशणार आहेत.