शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील फायबर मुताऱ्या गायब

By admin | Updated: November 19, 2014 22:40 IST

गडचिरोली शहराची लोकसंख्या ४५ हजाराच्या वर आहे. मात्र या शहरात सार्वजनिक मुताऱ्यांची अत्यंत कमतरता आहे. त्यामुळे नगर पालिकेने शहराच्या काही मुख्य भागात फायबर मुताऱ्या लावण्याचा निर्णय घेतला होता.

गडचिरोली : गडचिरोली शहराची लोकसंख्या ४५ हजाराच्या वर आहे. मात्र या शहरात सार्वजनिक मुताऱ्यांची अत्यंत कमतरता आहे. त्यामुळे नगर पालिकेने शहराच्या काही मुख्य भागात फायबर मुताऱ्या लावण्याचा निर्णय घेतला होता. दोन-तीन वर्षांपूर्वी लावण्यात आलेल्या या फायबर मुताऱ्या आता गायब झाल्या आहेत. त्यामुळे सर्वाधिक कुचंबना महिलांची होत आहे. या महत्वाच्या प्रश्नाकडे स्थानिक पालिका प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष झाले आहे. गडचिरोली शहरात ६ प्रभाग व २३ वॉर्ड आहेत. कॉम्प्लेक्स पासून लांजेडा पर्यंत पसरलेल्या या शहराची लोकसंख्या ४५ हजाराच्या वर आहे. या शहरात सार्वजनिक शौचालय व मुताऱ्या काही वॉर्डातच आहे. मात्र शहराच्या गर्दीच्या भागात एकाही ठिकाणी सार्वजनिक मुतारी नाही. त्यामुळे नागरिकांना लघुशंकेसाठी उघड्या जागांवरच जावे लागते. यामध्ये महिलांची मोठी कुचंबना होते. बसस्थानकावर सार्वजनिक शौचालय व मुतारीची व्यवस्था आहे. इंदिरा गांधी चौकामध्ये दोन ठिकाणी पक्क्या स्वरूपाच्या सार्वजनिक मुताऱ्या आहेत. शहरातील गुजरी बाजारात तसेच आठवडी बाजारात पक्क्या मुताऱ्या आहेत. या पलिकडे सार्वजनिक मुताऱ्या अन्यत्र कुठेही नाही. ही बाब लक्षात घेऊन काँग्रेसच्या तत्कालिन नगराध्यक्षांनी शहरात ५ते ७ ठिकाणी फायबर मूत्रिघरांची व्यवस्था केली होती. व त्यांना महत्वाच्या मार्गांवर लावूनही दिले होते. याचा वापर नागरिकांकडून वाढला होता. कालांतराने पालिकेचे दुर्लक्ष झाल्याने फायबर मुताऱ्या कोसळून तुटल्या. पालिका प्रशासनाने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. वर्षभराच्या आतच या मुताऱ्या जमिनदोस्त झाल्याने पुन्हा नव्याने त्या उभारण्याचे काम झाले नाही. सध्या देशभर स्वच्छता अभियान राबविले जात आहे. सार्वजनिक स्वच्छतेवर मोठा भर दिल्या जात आहे. या पार्श्वभूमिवर सार्वजनिक ठिकाणी मुताऱ्यांची व्यवस्था असणे, आता अनिवार्य आहे. गडचिरोली नगर पालिकेचे या दृष्टीने कोणतेही नियोजन नाही. शहरात बाहेरगावावरून येणाऱ्या महिलांना लघुशंकेसाठी जाण्याकरिता फार त्रास सहन करावा लागत आहे. शहरात आडोशांच्या जागांचीही कमतरता आहे. गडचिरोली नगर पालिकेने चामोर्शी मार्गावरील बसस्थानक , आयटीआय चौक, विश्राम भवन, कॉम्प्लेक्स परिसर, पोटेगाव मार्ग आदी भागात या मुताऱ्यांची व्यवस्था नव्याने करणे आवश्यक आहे. नुसत्या मुताऱ्या उभारून चालणार नाही, तर त्याच्या स्वच्छतेकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)