शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

नागरिकांना मिळणार खड्ड्यातून मुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 06:00 IST

चामोर्शी मार्गाप्रमाणेच आता पावसामुळे शहराच्या हद्दीतील आरमोरी मार्गावरही मोठे खड्डे पडले आहेत. इंदिरा गांधी चौक ते कठाणी नदीवरील पुलापर्यंत अनेक ठिकाणी खड्डे असल्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. लाखांदूर ते गडचिरोली असा हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाच्या भंडारा उपविभागांतर्गत येतो.

ठळक मुद्देमहामार्गाच्या कामाला सुरूवात : खासदारांच्या उपस्थितीत शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या काही वर्षात वारंवार खड्डेमय होत असलेल्या गडचिरोली-चामोर्शी-आष्टी या राष्ट्रीय महामार्गाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या मार्गाच्या सिमेंटीकरणास वेळ असला तरी आधी खड्डेमय झालेल्या रस्त्याची दुरूस्ती होणार आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून त्रास सहन करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.शुक्रवारी खासदार अशोक नेते, नगराध्यक्ष योगीता पिपरे यांच्या उपस्थितीत या कामाची सुरूवात झाली.यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणचे उपअभियंता आशिष आवळे, शाखा अभियंता प्रशांत खापरे, दीपक आंबुलकर, कनिष्ठ अभियंता लांजे, कंत्राटदार किशोर गायकवाड, नगरसेवक रमेश भुरसे, प्रमोद पिपरे, डॉ.भारत खटी, अनिल पोहणकर, गोविंद सारडा, नंदकिशोर सारडा, सुधाकर येनगंधलवार, न.प.उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे आदी अनेक पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. हे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी होत आहे.आरमोरी मार्गाचे काम केव्हा?चामोर्शी मार्गाप्रमाणेच आता पावसामुळे शहराच्या हद्दीतील आरमोरी मार्गावरही मोठे खड्डे पडले आहेत. इंदिरा गांधी चौक ते कठाणी नदीवरील पुलापर्यंत अनेक ठिकाणी खड्डे असल्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. लाखांदूर ते गडचिरोली असा हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाच्या भंडारा उपविभागांतर्गत येतो. वडसा ते गडचिरोलीपर्यंतच्या कामाचे अद्याप टेंडरही निघालेले नाही. त्यामुळे या मार्गावर गडचिरोली शहरात पडलेले खड्डे बुजविण्याची जबाबदारी कोण घेणार? त्यासाठी कोण पुढाकार घेणार? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

टॅग्स :Rainपाऊस