शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

बालक मृत्यू प्रकरण, कंत्राटी वैद्यकीय अधिकारी बडतर्फ

By संजय तिपाले | Updated: June 28, 2024 17:02 IST

सीईओंची कारवाई: तीन सदस्यीय समितीमार्फत चौकशी सुरु

गडचिरोली: रुग्णवाहिका न मिळाल्याने चार वर्षीय चिमुकल्याला कुटुंबीयाने एसटी बसमधून दवाखान्यात नेले, पण त्याचा मृत्यू झाला. या घटनेने आरोग्य विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला होता. दरम्यान, जि.प. सीईओ आयुषी सिंह यांनी या गंभीर प्रकरणात २८ जूनला कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यास तडकाफडकी बडतर्फ केले आहे. वैद्यकीय अधिकारी व वाहनचालक यांना नोटीस बजावली असून चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती गठीत केली आहे.

आर्यन अंकित तलांडी (४, रा. कोरेली ता. अहेरी) यास २३ जूनच्या रात्री पोटदुखीचा त्रास सुरु झाला.  कुटुंबाने पेरमिली आरोग्य केंद्रात त्याला उपचारासाठी नेले. उपचारानंतर आर्यनला पालकांनी घरी कोरेलीला परत नेले. २४ जूनला पहाटे   अधिक त्रास होऊ लागल्याने त्याला पुन्हा पेरमिली आरोग्य केंद्रात नेले.  वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन त्यास अहेरी येथे नेण्यास सांगितले. परंतु वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने पालक आर्यनला घेऊन बसने अहेरीसाठी निघाले. चालक गौरव आमले यांना लक्षात येताच त्यांनी बस थेट आलापल्ली येथील आरोग्य केंद्रात नेली, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. दरम्यान, तीन दिवसांनी ही बाब समोर आली. 'लोकमत'ने या प्रकरणास वाचा फोडल्यानंतर यंत्रणा हलली. सीईओ आयुषी सिंह यांनी पेरमिली आरोग्य केंद्रातील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल मेश्राम यांना बडतर्फ केले असून वैद्यकीय अधिकारी व वाहनचालक या दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 

....

अहवालाची प्रतीक्षादरम्यान, या प्रकरणाची वस्तूस्थिती जाणून घेण्यासाठी जिल्हा महिला व बालरोग अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली त्रिस्तरीय समिती नेमली आहे. यात तालुका वैद्यकीय अधिकारी व वाहन विभागातील अधिकाऱ्याचा समावेश आहे. २८ जूनला या समितीने पेरमिली आरोग्य केंद्रास भेट देऊन माहिती घेतली. समितीच्या अहवालानंतर कारवाईची पुढील दिशा ठरवली जाईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी सांगितले.

रुग्णवाहिका उपलब्ध, चालक गैरहजरया आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका उपलब्ध होती, पण आर्यन तलांडी यास रेफर करताना चालक गैरहजर होता, अशी माहिती प्राथमिक चौकशीत समोर आली आहे. हा चालक सुटीवर होता की त्याने अधिकाऱ्यांना न विचारता दांडी मारली होती, हे चौकशीतच स्पष्ट होणार आहे.  

टॅग्स :Deathमृत्यूGadchiroliगडचिरोली