शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांची रेकी करायला आला अन् स्वत:चा जाळ्यात अडकला; दोन लाखांचे बक्षीस असलेला छत्तीसगडचा नक्षलवादी गजाआड

By संजय तिपाले | Updated: December 6, 2023 19:16 IST

भामरागड तालुक्यात कारवाई

संजय तिपाले, गडचिरोली: खून, जाळपोळीच्या गंभीर गुन्ह्यांसह पोलिसांची शस्त्रे लुटून नेणाऱ्या, सरकारी मालमत्तेचे नुकसान करत धुडगूस घालणाऱ्या छत्तीसगडच्या नक्षलवाद्याला जेरबंद करण्यात पोलिसांना ६ डिसेंबर रोजी यश आले.  सध्या नक्षल्यांचा पीएलजीए सप्ताह सुरु आहे. पोलिसांची रेकी करण्यासाठी तो भामरागड तालुक्यात आला होता. मात्र, स्वत:च पोलिसांच्या जाळ्यात अलगद अडकला. त्याच्यावर महाराष्ट्र सरकारने दोन लाखांचे बक्षीस ठेवलेले होते.

महेंंद्र किष्टय्या वेलादी (वय ३२ , रा. चेरपल्ली, ता. भोपालपट्टनम, जि. बिजापूर ,छत्तीसगड) असे त्या नक्षल्याचे नाव आहे. २ ते ८ डिसेंबरदरम्यान नक्षल्यांचा पीएलजीए सप्ताह सुरु आहे. या सप्ताहात सार्वजनिक मालमत्ता तसेच पोलिसांना नुकसान पोहोचविण्याचा नक्षल्यांचा डाव असतो.१८ दिवसांत नक्षल्यांनी चार निष्पाप नागरिकांची हत्या करुन पोलसांना खुले आव्हान दिले होते. दरम्यान, भामरागड तालुक्यातील दामरंचा उपपोलिस ठाण्याच्या हद्दीतील इंद्रावती नदीजवळ महेंद्र वेलादी हा पोलिसांच्या हालचाली टिपण्यासाठी आला होता. गोपनिय माहितीच्या आधारे विशेष अभियान पथकाचे जवान, सीआरपीएफ ९ बटालियन जी कंपनीचे जवान व उपपोस्टे दामरंचा येथील पोलिसांनी माओवाद विरोधी अभियान राबवून त्याच्या मुसक्या आवळल्या. तो दामरंचा व मन्नेराजाराम या दोन्ही पोस्ट पार्टीच्या जवानांच्या नियमित कामकाजाच्या हालचालींवर पाळत ठेवून  अहेरी दलमच्या माओवाद्यांना माहिती पुरवीत होता.    पोलिस अधीक्षक नीलोत्पल अपर अधीक्षक यतीश देशमुख, कुमार चिंता, एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. जानेवारी २०२२ ते आतापर्यंत पोलिसांनी ७२ नक्षल्यांना गजाआड केले आहे.

अशी आहे गुन्हे कारकीर्द

मे २०२३ मध्ये सँड्रा गावातील निष्पाप नागरिकाची हत्या, सँड्रा जंगलात डिसेंबर २०१७ मध्ये व टेकामेट्टा जंग परिसरात डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या चकमकीत त्याचा सहभाग होता. २०२३ मध्ये कापेवंचा ते नैनेर मार्गावर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण तसेस त्यांचे वाहन पेटवून दिल्याचा आरोपही त्याच्यावर आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी