शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

आरमोरीत साकारतेय जम्मू-काश्मीरच्या चंडीमाताचे हुबेहुब मंदिर, होणार बर्फवृष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 15:07 IST

नवदुर्गा उत्सव मंडळाचा पुढाकार : कनकमाता मंदिराची प्रतिकृती

महेंद्र रामटेके लोकमत न्यूज नेटवर्क आरमोरी : नवरात्र दुर्गोत्सवासाठी विदर्भात प्रसिद्ध असलेल्या आरमोरी शहरात यावर्षी नवदुर्गा उत्सव मंडळ मोटारस्टँडच्या वतीने आंध्र प्रदेश राज्यातील विजयवाडा येथील कनकमाता मंदिराची व जम्मू काश्मीरमधील किस्तवाड जिल्ह्यातील मचेल येथील मचेल चंडीमाता मंदिराची प्रतिकृती साकारली जात आहे. विशेष म्हणजे या प्रतिकृतीच्या माध्यमातून भाविकांना साक्षात बर्फवृष्टी पाहायला मिळणार आहे. भाविकांना बर्फाच्छादित भागातून आवागमण करावे लागणार आहे.

आजपर्यंत साकारलेल्या इतर मंदिरांच्या प्रतिकृतीपेक्षा ही प्रतिकृती आकाराने, विस्ताराने सर्वात मोठी असणार आहे. सदर प्रतिकृती बघण्यासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लाखो भाविकांचा मोठा जनसागर उसळणार आहे. नवदुर्गा उत्सव मंडळाचे पदाधिकारी मागील ४१ वर्षांपासून निरनिराळ्या राज्यातील मंदिराच्या प्रतिकृती साकारत आहे. 

येथील नवरात्र उत्सव बघण्यासाठी केवळ विदर्भातीलच नव्हे तर इतर राज्यांतील अनेक जाती-धर्माचे लोक येत असतात. यावर्षी या मंदिराची प्रतिकृती १० हजार स्केअर फूटमध्ये असणार असून, तिची उंची जवळपास ५० फूट आहे. यापूर्वी या नवदुर्गा उत्सव मंडळाने वैष्णोदेवी, बंबलेश्वरी, अमरनाथ, पंचतत्त्व, शेगाव-शिर्डी, महल, पाताल भैरवी, पद्मनाथन, चार धाम, व्दारका, मथुरा, वृंदावन, अष्टविनायक, सर्वधर्मसमभाव, सत्यम शिवम सुंदरम, तिरुपती बालाजी, अक्कलकोट आदींसह अनेक प्रतिकृती साकारलेल्या आहेत. 

कनकमाता मंदिर प्रतिकृतीचे काम अंतिम टप्प्यात आले असून, गेल्या महिनाभरापासून कोलकाता येथील आर्किटेक्चर मंडळ व २० ते २५ मजूर ही प्रतिकृती बनविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. ही प्रतिकृती नवरात्र उत्सव मंडळाच्या कल्पनेतून साकार होत आहे. 

मंडळाने मागील ४० वर्षांपासून विविध असे देखावे सादर केले आहे. ही प्रतिकृती पाहण्यासाठी परराज्यांतून लोक येत असल्यामुळे व विदर्भात आरमोरी दुर्गोत्सव प्रसिद्ध असल्याने पोलिस प्रशासनानेही आपली जय्यत तयारी सुरू केली आहे. 

महिषासुर राक्षसाचा वध पाहायला मिळणारयावर्षी या मंदिराची प्रतिकृती तीन मजल्यांची असून, भाविक भक्तांना मुख्य प्रवेशव्दाराजवळ पहाडीतून आतमध्ये प्रवेश करावा लागणार आहे. यानंतर भाविकांना कनक दुर्गामातेचे दर्शन होणार आहे. पुढे गेल्यानंतर भाविकांना बर्फाच्छादित भागातून मार्ग काढावा लागून तिथे रणचंडी माता मंदिराचे व मातेचे दर्शन होणार आहे. शेवटी दुर्गामातेचा भव्य दरबार पाहायला मिळणार आहे. ज्यात दुर्गा भवानीमाता महिषासुर राक्षसाचा वध करताना दिसणार आहे. सदर प्रतिकृती डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे.

विजयवाडातून आणणार मातेची ज्योतघटस्थापनेला यावर्षी नवरात्र दुर्गा उत्सव मंडळाचे पदाधिकारी आंध्र प्रदेश राज्यातील विजयवाडा येथील कृष्णा नदीच्या काठावर असणाऱ्या कनक दुर्गा माता मंदिरात ज्योत आणण्यासाठी जाणार असून, या ज्योतीचे आगमन आरमोरी शहरात ३ ऑक्टोबरला सकाळी ९ वाजता होणार असून, लाखो भाविकांना या ज्योतीचे दर्शन घ्यावे, असे आवाहन नवदुर्गा उत्सव मंडळ मोटार स्टँडच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. 

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीNavratri Mahotsav 2024शारदीय नवरात्रोत्सव २०२४