शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

गावांचे प्रश्न सोडविण्याचे युवकांसमोर आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 01:26 IST

खेळ हा आदिवासींच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यातून आनंद मिळतो. शरीराला व्यायाम होतो. ज्यामुळे आपल्याला निरोगी राहण्यास मदत होते. पण खेळातून घडणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निर्माण होणारे संघटन.

ठळक मुद्देअभय बंग यांचे प्रतिपादन : सर्चमध्ये युवा संसदेला सुरूवात

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : खेळ हा आदिवासींच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यातून आनंद मिळतो. शरीराला व्यायाम होतो. ज्यामुळे आपल्याला निरोगी राहण्यास मदत होते. पण खेळातून घडणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निर्माण होणारे संघटन. या संघटनातूनच उद्याचे आदिवासी नेतृत्व पुढे येणार आहे आणि गावांचे प्रश्न सोडविणे, ही या नेतृत्वाची खरी कसोटी असल्याचे प्रतिपादन समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी केले.सर्च (शोधग्राम) येथे मंगळवारपासून आदिवासी युवा संसद कार्यक्रमांतर्गत डॉ. के.व्ही.चारी यांच्या स्मृती प्रित्यर्थ कबड्डी आणि व्हॉलिबॉल सामान्यांचे आयोजन करण्यात आले आहे. युवा संसदेचे उद्घाटन डॉ. अभय बंग यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी डॉ. राणी बंग आणि ज्येष्ठ समाजसेवक व माजी आमदार हिरामण वरखडे आदी उपस्थिती होती.डॉ. अभय बंग पुढे म्हणाले, आदिवासी युवक-युवतींना गणित, इंग्रजी हे विषय कठीण जात असतील, पण त्यांना धावायला सांगितले तर ते एका पायावर तयार राहतात. इथल्या निसर्गानेच त्यांना ही ताकद दिली आहे. ही ताकद वापरुनच खेळाची मैदाने गाजविण्याचा मूलमंत्र डॉ. बंग यांनी खेळाडूंना दिला.डॉ. राणी बंग यावेळी म्हणाल्या, खेळामुळे आनंद निर्माण होतो. मैत्री निर्माण होते. सर्व आदिवासी बांधव एकत्र येतात. ही एकीच तुमची ताकद आहे. शासनाने वनहक्क गावांना बहाल केले आहे. यातून गावे आर्थिकरित्या समृद्ध होत आहेत. पण या पैशाचा उपयोग गावाच्या, समाजाच्या विकासासाठी होणे आवश्यक आहे. जंगल वाचवणे ही आपली जबाबदारी आहे हे सांगतानाच तंबाखू, गुटखा, दारू या व्यसनांना जीवनातून कायम बाद करण्याचे आवाहन त्यांनी केले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात हिरामण वरखडे यांनी खेळाच्या जुन्या आठवणी जागविल्या. खेळामध्ये जीवन जगण्याचे गमक आहे. ते आनंदाने अनुभवा, असे आवाहन केले.मार्गदर्शनानंतर मान्यवरांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्ज्वलीत करून सामन्यांना सुरुवात झाली. गिरोला, रोंगावाही, भीमपूर, मर्केगाव, भेंडीकन्हार, वाघभूमी, कोवानटोला, कुथेगाव या गावांदरम्यान व्हॉलिबॉल तर फुलबोडी, रेंगाटोला, माळदा, कुथेगाव, पवनी, कुपानेर या गावांदरम्यान युवक युवतींचे कबड्डीचे सामने रंगणार आहेत.कार्यक्रमाचे संचालन नाजूक जाडे यांनी केले. सर्चचे ज्ञानेश्वर पाटील यांच्या मार्गदर्शनात सदर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.आयपीएल प्रो कबड्डी खेळाडू आज सर्चमध्येबुधवारी ७ फेब्रुवारी रोजी कबड्डी आणि व्हॉलिबॉलचे अंतिम सामने यू मुंबा प्रो कबड्डीचे खेळाडू पवन कुमार आणि श्रीकांत जाधव यांच्या उपास्थितीत होणार आहे. सामन्यानंतर हे खेळाडू सदर युवक युवतींना खेळाविषयी मार्गदर्शन करणार आहेत. दुर्गम भागातील खेळाडूंना त्यांच्या मार्गदर्शनामुळे खेळाविषयी प्रेरणा निर्माण होण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :Abhay Bangअभय बंग