गडचिराेली : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे एमएचटी-सीईटीच्या तारखांची घाेषणा करण्यात आली. मात्र, या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत १५ जुलैला संपली. इयत्ता बारावीच्या निकालानंतर हजाराे विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी अर्ज करावयाचा हाेता. मात्र मुदत संपल्याने अनेक विद्यार्थ्यांना अर्ज भरता आले नाही. परिणामी गडचिराेली जिल्ह्यातील बरेच विद्यार्थी एमएचटी-सीईटी परीक्षेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
गडचिराेली शहरासह जिल्हाभरात विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या माेठी आहे. त्यातील ७० टक्के विद्यार्थी सीईटी परीक्षा देतात.
बाॅक्स ...
यासाठी घेतली जाते सीईटी
अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, औषध निर्माण शास्त्र आणि कृषी अर्थात बीएसस्सी ॲग्री या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ही एमएचटी-सीईटी परीक्षा घेतली जाते.
बाॅक्स ....
अर्ज करण्यासाठी आणखी मुदत हवी
बारावीच्या निकालापूर्वीच एमएचटी-सीईटी परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत संपली. दरम्यान, संभ्रमावस्था निर्माण झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेसाठी अर्ज करता आला नाही. मुदत वाढविण्यात यावी, अशी मागणी हाेत आहे.
काेट ......
अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन करिअर करण्याचा माझा विचार हाेता. मात्र, बारावीची परीक्षा रद्द झाली. दरम्यान, निकाल कसा येणार या विवंचनेत हाेताे. सीईटीचा अर्ज भरला नाही.
- तुषार गेडाम, विद्यार्थी
काेट......
बीएसस्सी ॲग्री शिक्षणातून कृषी विभागात अधिकारी पदावर जाण्याचे माझे स्वप्न आहे. शेवटच्या दिवशी सीईटी परीक्षेचा अर्ज भरण्याचा प्रयत्न केला. मात्र इंटरनेटची अडचण आली.
- हर्षा भांडेकर, विद्यार्थिनी