शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

चामोर्शी शहरातील अंतर्गत रस्ते बकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 00:50 IST

चामोर्शी शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी जमा झाले असल्याने चिखल निर्माण झाले आहे. त्यामुळे चामोर्शीवासीय कमालीचे त्रस्त आहेत.

ठळक मुद्देडांबरी रस्त्यांवर पसरला चिखल : अनेक वर्षांपासून दुरुस्ती न झाल्याचा परिणाम, नवीन मुख्याधिकाऱ्यांपुढे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : चामोर्शी शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी जमा झाले असल्याने चिखल निर्माण झाले आहे. त्यामुळे चामोर्शीवासीय कमालीचे त्रस्त आहेत.चामोर्शी शहरातील शिवाजी ते बायपासकडे जाणाऱ्या मार्र्कंडादेव रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून रस्त्याची चाळणी झाली आहे. या मार्गावरून मार्र्कंडादेव येथे जाण्यासाठी भाविकांची वर्दळ राहते. सदर मार्ग डांबरी असला तरी डांबर शोधणे कठीण झाले आहे. ठिकठिकाणी गिट्टी व रेती बाहेर पडली आहे. कच्च्या मार्गाप्रमाणे सदर मार्ग दिसत आहे. बाजारपेठेकडे जाणाऱ्या मार्गावरही खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. खड्डे चुकवून वाहन पुढे नेताना वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. तहसील कार्यालयाकडे जाणाºया बायपास रस्त्यावर बीएसएनएल कार्यालयाजवळ रस्त्यावरील डांबर उखडला आहे. त्यामुळे या ठिकाणी पावसाचे पाणी साचून राहत असल्याने डबके निर्माण झाले आहे.तहसील कार्यालयाकडे जाण्यासाठी कमी अंतराचा मार्ग म्हणून नागरिक या मार्गावरून ये-जा करीत असतात. आष्टी कॉर्नर ते कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत शहरातील एकमेव मुख्य मार्ग असून या रस्त्यावर बसस्टँड, लक्ष्मी गेट, पशु वैद्यकीय दवाखान्याजवळ खड्डे पडले आहेत. पंचायत समिती कार्यालयाशेजारी दुकानगाळ्यांसमोर नाली नसल्याने पावसाचे पाणी दुकानगाळ्यांसमोर साचून राहते. या साचलेल्या पाण्यातूनच नागरिकांना वाट काढावी लागत आहे.गतिरोधकांमुळे अपघात वाढलेचामोर्शी शहरातील अंतर्गत रस्त्यांवर प्रत्येकी जवळपास १०० फूट अंतरावर ठिकठिकाणी गतिरोधक बांधण्यात आले आहेत. मात्र गतिरोधकाच्या नियमानुसार गतिरोधक बांधले नाही. गतिरोधक बांधतांना विशिष्ट उतार देणे आवश्यक असताना एकदम चढभाग ठेवण्यात आला आहे. त्यामुळे वाहनाचे इंजिन गतिरोधकाला लागते. त्यामुळे वाहन क्षतिग्रस्त होत आहेत. त्याचबरोबर एकाचवेळी वाहन वर चढल्याने एकदम मोठा धक्का वाहनचालकाला बसतो. वाहनचालकाचे लक्ष नसल्यास व एकाचवेळी वाहन गतिरोधकाला धडकते. त्यामुळे वाहनचालक वाहनासह कोसळत आहेत. चुकीच्या पद्धतीने गतिरोधक बनविल्याने अपघात घडण्याचे प्रमाण वाढले आहे.गुरुवारी चामोर्शी येथे आठवडी बाजार भरतो. या बाजाराला ग्रामीण भागातून हजारो नागरिक येतात. आठवडी बाजार शहराच्या मध्यभागी आहे. त्यामुळे अंतर्गत रस्ते गर्दीने फुलून जातात. वाहनांचीही गर्दी वाढते. यामुळेही अपघात वाढले आहेत.मागील अनेक वर्षांपासून अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली असताना नगर पंचायतीने दुरूस्ती केली नाही. त्यामुळे या रस्त्यांचे हाल झाले आहेत. याचा त्रास नागरिकांना होत आहे.

टॅग्स :Rainपाऊस