लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तालुक्याच्या धर्मपुरी गावाजवळील सर्वे क्रमांक ९४ मध्ये असलेल्या स्मशानभूमीवर अतिक्रमण करण्याच्या हेतूने सिरोंचा व नगरम येथील काही लोकांनी जमिनीचे सपाटीकरण करून कुंपण लावले. सदर प्रकार लक्षात येताच गावकऱ्यांनी एकजूट करून शुक्रवारी येथील अतिक्रमणाचा डाव उधळला व सोमवारी तहसीलदारांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली.नगरम मार्गाला लागून असलेल्या केशरजवळील जागेत मागील दहा दिवसांपासून सिरोंचा व नगरम येथील काही लोकांनी झुडपी जंगल तोडून दफनभूमीचे सपाटीकरण केले. त्यानंतर काहींनी शेतीसाठी तर काहींनी घराच्या जागेसाठी अतिक्रमणाच्या हेतूने कुंपण लावले. सपाटीकरणादरम्यान जमिनीत पुरलेले काही मृतदेहाचे सांगाडेसुद्धा बाहेर निघाले. तरीसुद्धा सदर व्यक्तींनी पर्यावरणाची हानी करून ट्रॅक्टरद्वारे सपाटीकरण केले. याबाबत धर्मपुरी येथील नागरिकांना माहिती झाली. परंतु सदर व्यक्तींचा प्रतिकार केला नाही. सदर जागा हडपण्याचा प्रकार होता. त्यामुळे गावात याबाबत सविस्तर चर्चा झाल्यानंतर नागरिकांनी एकजूट करून ३ जुलैैला दफनभूमीवरील अतिक्रमण हटविले. त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली.पाठबळ देणाऱ्या ‘त्या’ व्यक्तींवर कारवाई करासिरोंचा व नगरम येथील काही लोकांना अतिक्रमणासाठी धर्मपुरी येथील एक व्यक्ती सहकार्य करून पाठबळ देत आहे. सदर व्यक्तीनेसुद्धा वन जमिनीवर अतिक्रमण केले आहे. मात्र त्याच्यावर कारवाई झाली नाही. दफनभूमीवर अतिक्रमण करण्यास सहकार्य करून पाठबळ देणाऱ्या ‘त्या’ व्यक्तीवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली.
दफनभूमीतील अतिक्रमण उधळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 05:00 IST
नगरम मार्गाला लागून असलेल्या केशरजवळील जागेत मागील दहा दिवसांपासून सिरोंचा व नगरम येथील काही लोकांनी झुडपी जंगल तोडून दफनभूमीचे सपाटीकरण केले. त्यानंतर काहींनी शेतीसाठी तर काहींनी घराच्या जागेसाठी अतिक्रमणाच्या हेतूने कुंपण लावले. सपाटीकरणादरम्यान जमिनीत पुरलेले काही मृतदेहाचे सांगाडेसुद्धा बाहेर निघाले.
दफनभूमीतील अतिक्रमण उधळले
ठळक मुद्देकारवाईची मागणी : धर्मपुरीत अनेक लोकांनी शेती व घराच्या जागेसाठी केला कब्जा