शहरात रॅली : मराठा सेवा संघातर्फे विविध कार्यक्रम लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निमित्त गडचिरोली शहरातून रविवारी रॅली काढण्यात आली. त्याचबरोबर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष दादाजी चापले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन धर्मराव दुर्गमवार यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून राज बन्सोड, रामकिरीत यादव, परमानंद पुणमवार, शिवराय सामाजिक संघटनेचे अध्यक्ष परमानंद पुणमवार, प्रतीक डांगे, राष्ट्रीय ओबीसी युवा महोत्सवचे अध्यक्ष रूचित वांढरे, अंकित चांदेकर, नागापुरे, घोटेकर, बांदूरकर, दादाराव चुधरी, लेनगुरे, राहूल भांडेकर, अक्षय काटवले, दुर्गेश गौतम, निकेश मेश्राम, कार्तिक पराड, शुभम देवलवार, चेतन बावणे, भास्कर पेटकर, पारिक शिंदे, श्रेयश जुमनाके, विशाल फुकट, संदीप येनप्रेडीवार, प्रतीक नेवारे, रोशन संगीडवार, लक्ष्मीकांत टेकाम, प्रवीण कोटगले, जयंत कांबळे, साहिल कोकोडे, मयूर लाखे उपस्थित होते.
संभाजी महाराजांची जयंती साजरी
By admin | Updated: May 15, 2017 01:40 IST