शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

उद्योजकांना क्षमता वृद्धीचे प्रशिक्षण

By admin | Updated: July 12, 2015 02:08 IST

जिल्हा उद्योग केंद्र गडचिरोली यांच्या पुढाकाराने राईस मिल क्लस्टरच्या उद्योजकांना क्षमता वृद्धीचे प्रशिक्षण शुक्रवारी देण्यात आले.

गडचिरोली : जिल्हा उद्योग केंद्र गडचिरोली यांच्या पुढाकाराने राईस मिल क्लस्टरच्या उद्योजकांना क्षमता वृद्धीचे प्रशिक्षण शुक्रवारी देण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यात धानाचे प्रचंड प्रमाणात उत्पादन होते. त्यामुळे राईस मिलचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालू शकतो. काही उद्योजक हा व्यवसाय मागील कित्येक वर्षांपासून करीत आहेत. काही व्यापारी स्वत:च धान खरेदी करून त्याची मिलिंग केल्यानंतर विक्री करतात तर काही राईस मिलमालक घरगुती धान पिसाई करून देतात. चामोर्शी येथील उद्योजकांनी राज्यातील पहिले राईस मिल क्लस्टर निर्माण केले आहे. या क्लस्टरमध्ये सहभागी झालेल्या उद्योजकांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यशाळेला ५० उद्योजक उपस्थित होते. यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक डी. के. सिल्लारे, नाबार्डचे अधिकारी क्रिष्णा कोल्हे, केंद्राच्या सूक्ष्म, लघु, मध्यम मंत्रालयाचे सहाय्यक संचालक कंदारे, जिल्हा कृषी विज्ञान केंद्राचे संदीप कराडे, एस. पी. कोलते आदी उपस्थित होते. या सर्वच मान्यवरांनी उद्योजकांना मार्गदर्शन केले. गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतले जात असल्याने राईस मिल उद्योगाला चांगली संधी असल्याने हा अत्यंत चांगला उद्योग असल्याचे मार्गदर्शन केले. उद्योग स्थापन करण्यासाठी कोणत्या संस्थेकडून कर्ज उपलब्ध होईल, तांदळाची असलेली बाजारपेठ व उद्योगाबद्दलची माहिती पॉवर पार्इंट प्रेझेंटेशनद्वारे समजावून सांगितली. राईस मिल ट्रस्टचे उद्योजक रवींद्र ओल्लालवार यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. अशा प्रकारच्या कार्यशाळांमुळे राईसमिलचा उद्योग वाढण्यास फार मोठी मदत होईल, अशी अपेक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)