शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी
2
डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला
3
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
4
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
5
नद्यांना गतवैभव मिळवून देणार: मुख्यमंत्र्यांची ग्वाही; पाच ठिकाणी नालेसफाईचा पाहणी दौरा
6
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
7
६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!
8
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
9
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
10
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
11
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
12
विशेष लेख: ‘बाळ’ नव्हे, बाळाचा बापच खरा गुन्हेगार! मुले हाताबाहेर गेली तर दोष कुटुंबाचाच...
13
ठाणे डायरी | उन्हाळ्यात पाणी टंचाईला सुरुवात; ठाणेकर तहानलेले, मुंबईकर किती पाणी ढोसणार?
14
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही
15
अग्रलेख: दुष्काळात खाडा महिना! अलीकडच्या काळात दुष्काळात पाण्याची टंचाई हा कळीचा मुद्दा
16
मुक्काम पोस्ट महामुंबई | डोंबिवली स्फोट: जाओ, पहले उस आदमी का साइन लेकर आओ...
17
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
18
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
19
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
20
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 

आरोग्य केंद्र इमारतीचे काम प्रगतीपथावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 11:06 PM

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत चामोर्शी तालुक्याच्या लखमापूर बोरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे काम मंजूर केल्यानंतर हे काम जागेअभावी दोन वर्ष रखडले होते. मात्र एक हेक्टर जागा उपलब्ध झाली असून या जागेवर आरोग्य केंद्राच्या इमारतीचे काम सुरू आहे. सदर कामाने गेल्या दोन महिन्यांपासून वेग घेतला आहे.

ठळक मुद्देआरोग्य व्यवस्था होणार बळकट : डॉक्टरसह १५ कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी पाठपुरावा सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कलखमापूर बोरी : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत चामोर्शी तालुक्याच्या लखमापूर बोरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे काम मंजूर केल्यानंतर हे काम जागेअभावी दोन वर्ष रखडले होते. मात्र एक हेक्टर जागा उपलब्ध झाली असून या जागेवर आरोग्य केंद्राच्या इमारतीचे काम सुरू आहे. सदर कामाने गेल्या दोन महिन्यांपासून वेग घेतला आहे.लखमापूर बोरी येथे १५ वर्षांपूर्वी अ‍ॅलोपॅथिक दवाखान्याची निर्मिती करण्यात आली. यासाठी दोन मोठे इमारती व निवासस्थान उभारण्यात आले. सदर दवाखाना तीन वर्ष चालल्यानंतर अल्पावधीतच बंद पडला. त्यामुळे या परिसरात पुन्हा आरोग्य सेवेचा प्रश्न निर्माण झाला. गेल्या २० वर्षांपासून लखमापूर बोरी परिसरात प्रभावी आरोग्य सेवा नसल्याने येथे प्राथमिक आरोग्य केंद्र निर्माण करावे, अशी मागणी जोर धरू लागली. त्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकाºयांच्या पुढाकारातून येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात आले. जागेअभावी दोन वर्ष पीएचसी इमारतीचे काम रखडले. त्यानंतर येथील जि.प. उच्च प्राथमिक केंद्र शाळेच्या मालकीची एक हेक्टर जागा बांधकामासाठी उपलब्ध करून देण्यात आली. त्यानंतर जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर यांच्या हस्ते बांधकामाचा प्रत्यक्ष शुभारंभ करण्यात आला.चंद्रपूर येथील खासगी कंत्राटदारामार्फत आरोग्य केंद्राच्या इमारतीचे काम सुरू असून कॉलमचे काम पूर्ण झाले असून पुढील काम सुरू आहे. या कामाच्या माध्यमातून मजुरांना रोजगारही मिळाला आहे. सदर प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम येत्या दीड वर्षात पूर्ण होणार असून त्यानंतर या भागातील नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे.सदर प्राथमिक आरोग्य केंद्रात कामकाज चालविण्यासाठी वैद्यकीय अधिकाºयांसह एकूण १५ आरोग्य कर्मचाºयांची आवश्यकता आहे. सदर पदे शासनाने मंजूर करावी, यासाठी या भागातील लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा सुरू आहे. लवकरच याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार आहे.