बाॅक्स
बुध्दिस्ट सोसायटीतर्फे कार्यक्रम
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता दि बुध्दिस्ट सोसायटी आफ इंडिया गडचिरोली शाखेच्या वतीने २६ मे रोजी ऑनलाईन बुध्दपाैर्णिमा कार्यक्रम घेण्यात आला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष अभियंता नरेश मेश्राम होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून बुध्दिस्ट सोसायटीचे देसाईगंज उपविभागीय अध्यक्ष प्रा. विनोद चहारे, गडचिरोली उपविभागीय अध्यक्ष सोपानदेव मशाखेत्री, अहेरी उपविभागीय अध्यक्ष प्रा.सुरेंद्र तावाडे, जिल्हा शाखेचे सल्लागार धम्मानंद मेश्राम, अशोक गडकरी उपस्थित हाेते. याप्रसंगी मान्यवरांसह बुध्दिस्ट सोसायटीच्या पदाधिकारी संगीता रामटेके, सदस्य सचिन वैद्य व नम्रता मेश्राम यांनीही धम्माबाबत मनोगत व्यक्त केले. संचालन जिल्हा उपाध्यक्षा ॲड.सोनाली मेश्राम, प्रास्ताविक जिल्हा प्रवक्ते विजय बन्सोड तर आभार जिल्हा महासचिव धम्मराव तानादू यांनी मानले. तुषार भडके, राज बन्सोड, गौतम लांडगे व देवव्रत रामटेके यांनी तंत्रसहायक म्हणून काम पाहिले.
===Photopath===
260521\26gad_3_26052021_30.jpg
===Caption===
देसाईगंज येथे मार्गदर्शन करताना मुख्य प्रवर्तक विजय बन्साेड.