शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएफ जवानाची दुचाकीला धडक

By admin | Updated: January 28, 2017 01:17 IST

आजारी आईच्या भेटीसाठी कुटुंबीयांसह जात असलेल्या पोलिसाच्या मोटारसायकलला मद्यधुंद बीएसएफ जवानाने जबर धडक दिल्याने

पोलीस जवानासह तिघे गंभीर : देसाईगंज-आरमोरी मार्गावरील पेपरमील नजीकची घटनादेसाईगंज : आजारी आईच्या भेटीसाठी कुटुंबीयांसह जात असलेल्या पोलिसाच्या मोटारसायकलला मद्यधुंद बीएसएफ जवानाने जबर धडक दिल्याने तीन जणांना गंभीर दुखापत झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी ३.१५ वाजताच्या सुमारास देसाईगंज-आरमोरी मार्गावरील जेजानी पेपरमील जवळच्या अवतार सिमेंट प्रॉडक्टसमोर घडली.देसाईगंज पोलीस ठाण्यात कार्यरत सतीश खरकाटे हे आपल्या एम. एच. ३३ आर. ६६१५ या मोटारसायकलने पत्नी अस्मिता (३९), मूलगी शर्वरी (९) व शरयू (३) यांच्यासह आजारी आईच्या भेटीसाठी आरमोरीला जात होते. जेजानी पेपरमिल जवळच्या अवतार सिमेंट प्रॉडक्टसमोर पोहचताच मागून मद्यधूंद अवस्थेत भरधाव वेगाने येत असलेल्या बीएसएफ जवानाने खरकाटे यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यात सतीश खरकाटे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. बीएसएफ जवान मंगेश मडावी (३०) तसेच त्याच्या मागे बसलेला नरेंद्र वझाडे (४०) दोघेही रा.जोगीसाखरा हेदेखील गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर देसाईगंज येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करुन त्यांना गड़चिरोलीला हलविण्यात आले. सतीश खरकाटे यांची पत्नी अस्मिता खरकाटे, मुलगी शर्वरी खरखाटे व शरयू खरकाटे यांना किरकोळ मार लागला. (तालुका प्रतिनिधी)