अखिल भारतीय पोलिस क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीत गडचिरोली पोलिसांना कांस्यपदक

By संजय तिपाले | Published: February 22, 2024 11:59 AM2024-02-22T11:59:54+5:302024-02-22T12:00:26+5:30

उपनिरीक्षक सूरज अनपट यांची अखिल भारतीय पोलिस स्पर्धेत कामगिरी

Bronze medal for Gadchiroli Police in Archery in All India Police Sports Competition | अखिल भारतीय पोलिस क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीत गडचिरोली पोलिसांना कांस्यपदक

अखिल भारतीय पोलिस क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीत गडचिरोली पोलिसांना कांस्यपदक

गडचिरोली: अखिल भारतीय पोलिस क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीमध्ये येथील उपनिरीक्षक सूरज सुनील अनपट यांनी महाराष्ट्र पोलिस संघाचे नेतृत्व करत यशस्वीपणे निशाणा साधत कांस्यपदकाला गवसणी घातली. यामुळे जिल्हा पोलिस दलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील गडचिरोलीत पोलिस अधिकारी व अंमलदारांना दुर्गम, अतिदुर्गम भागात कर्तव्य बजवावे लागते. नक्षल्यांशी दोन हात करताना अनेक पोलिस अधिकारी विविध कलागुण जोपासत असतात. दरम्यान, आरमोरी पोलिस ठाण्यात कार्यरत उपनिरीक्षक सूरज अनपट हे तिरंदाजीतील उत्कृष्ठ खेळाडू म्हणून ओळखले जातात. कर्नाटकच्या बेंगळुरू येथे झालेल्या १२ व्या अखिल भारतीय पोलिस तिरंदाजी स्पर्धेत त्यांनी महाराष्ट्र संघाचे नेतृत्व केले.  महाराष्ट्र पोलीस संघाने आयटीबीपी संघाचा ६-४ अशा फरकानेे पराभव करत कांस्यपदक पटकावले. उपनिरीक्षक अनपट यांचा २१ फेब्रुवारी रोजी पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सत्कार केला.  यावेळी अपर अधीक्षक (अभियान)यतीश देशमुख, अहेरीचे  अपर  अधीक्षक  एम. रमेश उपस्थित होते.

Web Title: Bronze medal for Gadchiroli Police in Archery in All India Police Sports Competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस