विलास चिलबुले ।लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : आरमोरी-ब्रम्हपुरी मार्गावर आरमोरीपासून तीन किमी अंतरावरील वैैनगंगा नदीच्या पुलावर तीन मोठे खड्डे गेल्या अनेक दिवसांपासून पडले आहेत. सदर खड्ड्यांमुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता बळावली आहे. मात्र या गंभीर बाबीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. मागणी करूनही उपाययोजना होत नसल्याने या पुलाचा वाली कोण? असा सवाल शेकडो वाहनधारक उपस्थित करीत आहेत.सन १९८९ मध्ये ब्रम्हपुरी मार्गावरील वैैनगंगा नदीवर पुलाची निर्मिती करण्यात आली. निर्मितीपासून तर आजतागायत सदर पुलाची एकदाही डागडुजी करण्यात आली नाही, अशी माहिती आहे. नागपूर-गडचिरोली हा राज्य मार्ग आता राष्ट्रीय महामार्गात रूपांतरित झाला असून हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे देखभाल व दुरूस्तीसाठी हस्तांतरित करण्यात आला आहे.ब्रम्हपुरी-आरमोरी मार्गाच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम नव्याने वर्षभरापासून सुरू आहे. आणखी सहा महिने हे काम चालणार आहे. मात्र सदर महामार्गावर व पुलावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. परिणामी जीव मुठीत घेऊन वाहनधारकांना प्रवास करावा लागत आहे.ब्रम्हपुरी-आरमोरी दरम्यानचे राष्ट्रीय महामार्गाच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सध्या सुरू आहे. वैैनगंगा नदीवरील पुलावर पडलेले खड्डे बुजविण्याच्या सूचना संबंधित काम सोपविण्यात आलेल्या कंत्राटदारांना करण्यात येतील, या पुलावरील जुन्या कठड्यांची तुटफुट झाली आहे. सदर पुलावर आवश्यक असलेले नवीन कठडे कंत्राटारामार्फत लावण्यात येतील. सदर मार्ग पुलाच्या समस्येकडे आपले लक्ष आहे.- टी. बी. तुंगीलवार, उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, विभाग नागपूर
पुलावरच्या सळाखी आल्या बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 01:30 IST
आरमोरी-ब्रम्हपुरी मार्गावर आरमोरीपासून तीन किमी अंतरावरील वैैनगंगा नदीच्या पुलावर तीन मोठे खड्डे गेल्या अनेक दिवसांपासून पडले आहेत. सदर खड्ड्यांमुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता बळावली आहे.
पुलावरच्या सळाखी आल्या बाहेर
ठळक मुद्देवाहनधारकांचा धोकादायक प्रवास : आरमोरीनजीकच्या वैैनगंगा नदीवरील समस्या