शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
3
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
4
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
5
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
6
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
7
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
8
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
9
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
10
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
11
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
12
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
13
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
14
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
15
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
16
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
17
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
18
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
19
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
20
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप

वीट मारल्याचा बदला खुनाने, तणसाच्या ढिगात जाळला मृतदेह

By संजय तिपाले | Updated: January 7, 2024 20:52 IST

धानोरा तालुक्यातील थरार: मजुरांतील वाद टोकाला, आरोपी जेरबंद

गडचिरोली : वीटभट्टीवर काम करणाऱ्या दोन मजुरांत दारु पिल्यानंतर वाद झाला. एका मजुराने दुसऱ्याच्या डोक्यात वीट मारली, त्याचा राग अनावर झाल्याने वीट मारल्याचा बदला कुऱ्हाडीने हल्ला चढवून घेतला. मजुराचा खून केल्यानंतर तणसाच्या ढिगावर मृतदेह ठेऊन तो जाळला. ६  जानेवारीला धानाेरा तालुक्यातील खेडी गावाच्या शिवारात हा थरार घडला. पोलिसांनी २४ तासांत या घटनेचा उलगडा करुन आरोपीला जेरबंद केले. विशेष म्हणजे, मयत व आरोपी दोघेही एकाच गावचे असून वय पासष्टीपार आहे.

  मनोहर नत्तू आत्राम (६७, रा. कन्हाळगाव) असे मृताचे नाव आहे. जयदेव कोलू हलामी (६५,रा.कन्हाळगाव) हा आरोपी आहे. कन्हाळगावजवळील खेडी येथे नाजूकराव ताडाम (रा. रांगीटोला) यांची वीटभट्टी आहे. तेथे मनोहर आत्राम व जयदेव हालामी हे विटा बनविण्याचे काम करत. अनेकदा ते वीटभट्टीच्या ठिकाणीच मंडपात मुक्काम करत. ६ जानेवारीला दिवसभर काम केल्यावर दोघेही तेथेच मुक्कामी राहिले. दोघांनीही रात्री सोबतच जेवण बनवले. थंडीमुळे जवळच शेकोटीही पेटवली होती. जेवणाचा आस्वाद घेत त्यांनी सोबत मद्यपानही केले. मात्र, याचवेळी विटा बनविण्याच्या कामावरुन त्यांच्यात वाद झाला. शाब्दिक चकमकीचे पर्यवसान हाणामारीत झाले. मयत मनोहर यांनी रागाच्या भरात जवळची वीट उचलून जयदेवच्या डोक्यात मारली. जयदेवच्या डोक्यात इजा झाली. यांनतर त्याचाही राग अनावर झाला.

संतापाच्या भरात जवळ पडलेली कुऱ्हाड उचलून त्याने मनोहर आत्राम यांच्यावर निर्दयीपणे वार केले. डोक्यात वर्मी घाव बसल्याने रक्तस्त्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेनंतर जयदेव हलामी भानावर आला. त्याने स्वत:चा बचाव करण्यासाठी मंडपातील तणसाच्या ढिगावर मनोहर आत्राम यांचा मृतदेह ठेऊन शेकोटीतील आगीने संपूर्ण मंडप पेटवून दिला. यात मनोहर यांच्या शरीराचा कोळसा झाला. दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह जळालेल्या स्थितीत आढळल्याने खळबळ उडाली. उपअधीक्षक साहिल झरकर, धानोरा ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुंदन गावडे यांनी घटनास्थळी भेट दिली.

..अन् संशयाची सूई जयदेवच्या दिशेने

घटनेच्या आधी मनोहर हे शेवटी जयदेव हलामीसोबत असल्याची माहिती मिळाली अन् पोलिसांनी तपासाची दिशा त्याच्या दिशेने वळवली. जयदेवला घरातून ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्याने थरारपट उलगडला. मयत मनोहर आत्राम यांची पत्नी शशिकला आत्राम यांच्या फिर्यादीवरुन जयदेव हलामीविरुध्द खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. उपनिरीक्षक सुमित चेवले, हवालदार रामगोपाल खवास, सुधाकर पुराम, संतोष मलगाम, पो.ना. लक्ष्मीकांत काटेंगे, गीतेश्वर बोरकुटे, पो.शि. मंगेश राऊत, पंकज भांडेकर यांनी ही कारवाई केली.