काेराेनाकाळातही लाचखाेरी जाेरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 05:00 AM2021-02-15T05:00:00+5:302021-02-15T05:00:37+5:30

मागील तीन वर्षांच्या कालावधीत सुमारे ४५ सापळे रचण्यात आले आहेत. त्यात ५९ आराेपींना अटक करण्यात आली आहे. २०१८ मध्ये १६ सापळ्यांमध्ये तेवढ्याच आराेपींना अटक करण्यात आली आहे. यात वर्ग-२ चे ४, वर्ग-३ चे १०, वर्ग-४ चे १ व  इतर लाेकसेवक १ जणाला अटक करण्यात आली आहे. २०१९ मध्ये १४ सापळ्यांमध्ये २० जणांना अटक करण्यात आली आहे.

Bribery is rampant even in the past | काेराेनाकाळातही लाचखाेरी जाेरात

काेराेनाकाळातही लाचखाेरी जाेरात

Next
ठळक मुद्दे२०२० मध्ये २३ जणांना केली अटक; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : काेराेनाच्या साथीला प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र शासनाने लाॅकडाऊन जाहीर केले हाेते. २०२० या वर्षातील बहुतांश दिवस लाॅकडाऊनमध्येच गेले. याचा माेठा फटका उद्याेग, व्यवसाय, मजूर, खासगी कंपन्यांमध्ये कार्यरत कर्मचारी व सामान्य नागरिकांना बसला. मात्र, याही कालावधीत शासकीय कर्मचाऱ्यांची लाचखाेरी तेजीत हाेती. २०२० या वर्षात एसीबीने १५ सापळे रचून २३ लाचखाेरांना अटक केली आहे. 
शासकीय काम करून देण्यासाठी लाच मागणे व स्वीकारणे हा गुन्हा आहे. लाच मागणाऱ्या व स्वीकारणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी शासनाने स्वतंत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची निर्मिती केली आहे. तक्रारकर्त्याकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर या तक्रारीची शहानिशा करून सापळा रचला जातो. एसीबीच्या वतीने नागरिकांमध्येे लाचलुचपत न देण्याविषयी जागृती केली आहे. त्यामुळे एखाद्या शासकीय कर्मचारी किंवा अधिकाऱ्याने लाच मागितल्यास त्याची तक्रार एसीबीकडे करण्याचे प्रमाण वाढले असले तरी त्यात पुन्हा वाढ हाेण्याची आवश्यकता आहे.  काेराेनाकाळात अनेकांचा राेजगार गेला, व्यवसाय बुडाला, अनेक कंपन्या पूर्णपणे बुडाल्या; मात्र अशाही स्थितीत पाेलीस व आराेग्य विभागाचे कर्मचारी वगळता इतर शासकीय कर्मचारी व अधिकारी मजा भाेगत हाेते. घरी राहूनही पूर्ण पगार  मिळत हाेता; मात्र अशाही स्थितीत या कर्मचाऱ्यांची लाचेची आस कमी झाली नाही.
लाच स्वीकारणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्याला निलंबित किंवा बडतर्फ करण्यासाेबतच त्याला कारावासाची शिक्षा सुनावण्याची गरज निर्माण झाली आहे.

तीन वर्षांमध्ये ४५ सापळे 
मागील तीन वर्षांच्या कालावधीत सुमारे ४५ सापळे रचण्यात आले आहेत. त्यात ५९ आराेपींना अटक करण्यात आली आहे. २०१८ मध्ये १६ सापळ्यांमध्ये तेवढ्याच आराेपींना अटक करण्यात आली आहे. यात वर्ग-२ चे ४, वर्ग-३ चे १०, वर्ग-४ चे १ व  इतर लाेकसेवक १ जणाला अटक करण्यात आली आहे. २०१९ मध्ये १४ सापळ्यांमध्ये २० जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात वर्ग-१ चा १, वर्ग-२ चे २, वर्ग-३ चे ११,  इतर लाेकसेवक २ व खासगी ४ व्यक्तींचा समावेश आहेे. २०२० मध्ये १५ सापळे रचून २३ आराेपींना अटक करण्यात आली. त्यात वर्ग-२ चे ६, वर्ग-३ चे १२, वर्ग-४ चे १, इतर लाेकसेवक २ व दाेन खासगी व्यक्तींचा समावेश आहे.

 

Web Title: Bribery is rampant even in the past

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.