वन व्यवस्थापन व व्यवस्थापनाबाबत विचारमंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:34 AM2021-03-06T04:34:54+5:302021-03-06T04:34:54+5:30

समन्वय कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी ग्रूप ऑफ ग्रामसभा कुरखेडाचे अध्यक्ष चुडामणी वाघ होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून संवर्ग विकास अधिकारी अनिता तेलंग, ...

Brainstorming on forest management and management | वन व्यवस्थापन व व्यवस्थापनाबाबत विचारमंथन

वन व्यवस्थापन व व्यवस्थापनाबाबत विचारमंथन

Next

समन्वय कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी ग्रूप ऑफ ग्रामसभा कुरखेडाचे अध्यक्ष चुडामणी वाघ होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून संवर्ग विकास अधिकारी अनिता तेलंग, प्रमुख अतिथी म्हणून सहायक पशुसंवर्धन आयुक्त डॉ. संगीता निरगुडकर-तलमले, यवतमाळचे सत्यजीत जेना, ग्रामआराेग्य संस्थेचे संचालक रूपचंद दखने, शिवलाल कोडाप, वीणा हलामी उपस्थित होते. प्रास्ताविकातून रूपचंद दखने यांनी वन संवर्धन व व्यवस्थापन आराखडा तयार करण्याची प्रक्रिया व त्याची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता, वन हक्क कायद्यानुसार ज्या गावांना सामूहिक वन हक्क दावे जिल्हा प्रशासनाने मान्य केलेले आहे, त्या गावांचे आदिवासी विकास विभागाच्या सहकार्याने १० गावातील वन संवर्धन व व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचे काम ग्राम आरोग्य संस्था घाटी या संस्थेने पूर्ण करून आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, आदिवासी विकास विभाग व वन विभाग यांना आराखड्याची प्रत सादर करण्यात आलेली आहे, तसेच ग्रुप ऑफ ग्रामसभामार्फत तेंदू पाने संकलन व विक्री प्रक्रियेविषयी माहिती दिली.

संवर्ग विकास अधिकारी तेलंग यांनी गावाचा शाश्वत विकास घडवून आणायचा असेल तर ग्रामसभा मजबूत असणे गरजेचे आहे. गावाचा विकास आराखडा हा योग्य प्रकारे तयार करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पाठपुरावा करावा, असे आवाहन केले. डॉ. संगीता निरगुळकर यांनी पशुसंवर्धन विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या याेजनांची माहिती दिली. सत्यजीत जेना यांनी वन संवर्धन ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन केले. कार्यशाळेचे संचालन देवानंद जनबंधू तर आभार शुभांगी दखने यांनी मानले. यशस्वीतेसाठी वनिता पेटकर, रामचंद्र सहारे, रागिनी दखने, सुप्रिया बन्सोड, दीक्षित बन्सोड यांनी सहकार्य केले. सोनेरांगी, वासी, चिनेगाव, डोंगरगाव, कोसी, जांभळी येथील सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

बाॅक्स

ग्रामसभांकडून लाेकाेपयाेगी कामे

ग्रामसभेला मिळालेल्या उत्पन्नातून जांभळी ग्रामसभेने वन संवर्धनाची व सोनेरांगी ग्रामसभेने समाज उपयोगी कामे केलेली आहेत, तसेच २०२१ मध्ये ११ ग्रामसभा मिळून तेंदू पाने संकलन व विक्री करण्याकरिता लिलाव प्रक्रिया करण्यात आली आहे. वन संवर्धन व व्यवस्थापन आराखड्यामधील रोहयो अंतर्गत सोनेरांगी, वासी, चिनेगाव येथे मजगी व बोडी खोलीकरणाची

कामे याविषयी माहिती कार्यशाळेत देण्यात आली.

Web Title: Brainstorming on forest management and management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.