शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

आमदार गजबेंच्या गावात मागासवर्गीय कुटुंबावर बहिष्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 12:00 IST

वडिलोपार्जित कब्जा वहिवाट असल्याचे स्पष्ट

गडचिरोली : देसाईगंज तालुक्यातील पोटगाव गट ग्रामपंचायतीअंतर्गत विठ्ठलगाव येथे संरक्षण भिंतीच्या वादातून अनुसूचित जातीतील एका कुटुंबावर बहिष्कार घातल्याची खळबळजनक तक्रार आदिवासी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष छगन शेडमाके यांनी १९ जूनला जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली.

पाेटगाव हे आरमोरीचे भाजप आमदार कृष्णा गजबे यांचे मूळ गाव आहे. या ग्रामपंचायतीतील विठ्ठलगाव येथील घनश्याम लांडगे यांना प्रकल्प अधिकारी गडचिरोली यांनी १२ मार्च २०१० रोजी वनहक्क पट्ट्याने भू. मा. क्र. १४४ आराजी-०.०४ हे.आर. जमीन दिली आहे. लांडगे यांचा वडिलोपार्जित कब्जा वहिवाट असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना सदर जागेचा वनहक्क पट्टा मिळाला आहे. सदर जागेवर लांडगे हे कुटुंबासह राहतात. घराच्या बाजूला बौद्ध विहार असून, लगत लांडगे यांची खुली जागा आहे.

बौद्ध विहाराच्या संरक्षण भिंत बांधकामाकरिता शासनस्तरावरून १० लाख रुपये मंजूर आहेत. लांडगे यांच्या मालकीच्या जागेत असलेले गोबरगॅस टाक्या तोडून संरक्षण भिंत बांधण्याचे काम सुरू आहे. लांडगे यांनी विरोध केला असता आमदार गजबे यांनी धमकावले व त्यानंतर संपूर्ण गावाने लांडगे कुटुंबाला बहिष्कृत केले. चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी छगन शेडमाके यांनी केली आहे.

यासंदर्भात आमदार कृष्णा गजबे यांना वारंवार संपर्क केला, परंतु त्यांनी भ्रमणध्वनी घेतला नाही, त्यामुळे त्यांची बाजू कळाली नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGadchiroliगडचिरोली