लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालय गडचिरोलीअंतर्गत आधारभूत खरेदी योजनेंतर्गत २०१८-१९ च्या हंगामात मोठ्या प्रमाणात धानाची खरेदी करण्यात आली. महामंडळाच्या वतीने जिल्हाभरातील ३६ हजार ४५८ शेतकऱ्यांना ४७ कोटी ७४ लाख ४५ हजार रुपयांचा बोनस वितरित करण्यात आला आहे.आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने अहेरी उपविभागासह गडचिरोली जिल्ह्यात आविका संस्थेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात धान खरेदी केली जाते. शेतकऱ्यांचा माल आविका संस्थेच्या केंद्रांवर विक्रीसाठी यावा, तसेच शेतकऱ्यांना न्याय मिळावा, या उद्देशाने शासनाच्या वतीने बोनस दिला जातो. गेल्या काही वर्षापासून क्विंटलमागे शेतकऱ्यांना २०० रुपये प्रमाणे बोनस वितरित केला जात होता. गतवर्षीच्या हंगामात युती शासनाने प्रतीक्विंटल ५०० रुपये बोनस जाहीर केला होता. त्याची अंमलबजावणी केली जात आहे.महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत कुरखेडा, कोरची, आरमोरी, धानोरा, घोट व अहेरी असे सहा उपप्रादेशिक कार्यालये आहेत. या उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत जवळपास ८० केंद्रांवरून गतवर्षीच्या हंगामात धानाची खरेदी करण्यात आली. खरेदी केल्यानंतर महामंडळाच्या वतीने धान चुकाऱ्याची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात अदा केली जाते. मात्र बोनसची रक्कम वळती करण्यासाठी विलंब लागतो. कारण आविका संस्थांकडून खरेदीचा संपूर्ण हिशोब व हुंड्या तसेच विवरण सादर करणे आवश्यक आहे. हे विवरण सादर होण्यासाठी हंगामात दोन ते तीन महिन्यांचा अवधी लागतो. त्यानंतर महामंडळ कार्यालयाच्या वतीने आविका संस्थेचा खरेदीचा हिशेब तपासून व बँक खात्याची पडताळणी करून संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात क्विंटलनुसार बोनसची रक्कम अदा केली जाते. २०१८-१९ च्या हंगामात आविका संस्थेच्या केंद्रावर धानाची विक्री केलेल्या ३६ हजार ४५८ शेतकऱ्यांना प्रती क्विंटल ५०० रुपयानुसार एकूण ४७ कोटी ७४ लाख ४५ हजार ५२५ रुपये इतकी रक्कम बोनसच्या स्वरूपात अदा करण्यात आली आहे. महामंडळाच्या वतीने ही कार्यवाही एप्रिल ते आॅक्टोबर २०१९ आली आहे.५० क्विंटलपर्यंत मर्यादाआदिवासी विकास महामंडळाच्या वतीने गतवर्षीच्या हंगामात साधारण प्रतीच्या धानाला प्रती क्विंटल १ हजार ७५० रुपये भाव देण्यात आला. तसेच प्रती क्विंटल ५०० रुपये बोनस देण्यात आला. त्यामुळे क्विंटल मागे २ हजार २५० रुपये भाव शेतकऱ्यांना पडला. मात्र बोनसची मर्यादा ५० क्विंटलपर्यंत आहे. ५० क्विंटलपेक्षा अधिक धान विकलेल्या शेतकºयाला बोनस लागू होत नाही. ५१ व्या क्विंटलपासून पुढे धानाला बोनस दिला जात नाही.
४७ कोटी ७४ लाखांचा बोनस वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 06:00 IST
आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने अहेरी उपविभागासह गडचिरोली जिल्ह्यात आविका संस्थेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात धान खरेदी केली जाते. शेतकऱ्यांचा माल आविका संस्थेच्या केंद्रांवर विक्रीसाठी यावा, तसेच शेतकऱ्यांना न्याय मिळावा, या उद्देशाने शासनाच्या वतीने बोनस दिला जातो. गेल्या काही वर्षापासून क्विंटलमागे शेतकऱ्यांना २०० रुपये प्रमाणे बोनस वितरित केला जात होता.
४७ कोटी ७४ लाखांचा बोनस वाटप
ठळक मुद्दे३६ हजार शेतकऱ्यांना मिळाला लाभ : आदिवासी विकास महामंडळातर्फे रक्कम थेट खात्यात जमा