लोकमत न्यूज नेटवर्क आलापल्ली : चंद्रपूरवरून सिरोंचाकडे येणाऱ्या बोलेरो या भरधाव चारचाकी वाहनाने झाडाला धडक दिल्यामुळे वाहनातील चार जण जखमी झाले. हा अपघात आलापल्ली-सिरोंचा मार्गावर बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. या अपघातातील जखमींना गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जखमींमध्ये राजेराम मलय्या काशेट्टीवार (५०), सावित्री राजेराम काशेट्टीवार (४०) रा. टेकडाताला ता. सिरोंचा, पुष्पलता नीलम (३५), व्यंकटस्वामी नीलम (५०) यांचा समावेश आहे. राजेराम काशेट्टीवार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून सावित्री काशेट्टीवार यांच्या डोक्याला व अन्य अवयवाला जखमा झाल्या आहेत. पुष्पलता नीलम किरकोळ जखमी असून व्यंकटस्वामी नीलम यांच्या छातीला दुखापत झाली आहे. सर्व जखमींना प्रथम अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. त्यानंतर या सर्वांना गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. सिरोंचा तालुक्यातील टेकडा येथील रहिवासी रामकृष्ण नीलम हे आपल्या कुटफंबीयांसोबत चंद्रपूरला गेले होते. बुधवारी रात्री एमएच-३३-ए-६०९८ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने चंद्रपूरवरून सिरोंचाकडे परत येताना गोलाकर्जी गावाजवळ रात्री २ वाजताच्या सुमारास वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहनाची झाडाला धडक बसली. सदर वाहनात सात जण बसून होते, यापैकी दोघेजण गंभीर जखमी झाले. सदर वाहनातील बोलेरो वाहन प्रचंड क्षत्रिग्रस्त झाले.
बोलेरो झाडाला धडकली, चार जखमी, दोन गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2017 01:44 IST