शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
4
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
5
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
6
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
7
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
8
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
9
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
10
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
11
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
12
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
13
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
14
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
15
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
16
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
17
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
18
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
19
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
20
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
Daily Top 2Weekly Top 5

अहेरीत १०० रक्तदात्यांचे रक्तदान

By admin | Updated: August 29, 2016 02:11 IST

जगद्गुरू श्री नरेंद्राचार्य महाराज यांच्या ५० व्या जन्मोत्सवानिमित्त जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज संप्रदाय तालुका अहेरीच्या वतीने

उपजिल्हा रुग्णालयात शिबीर : जगद्गुरू नरेंद्र महाराज संप्रदायाचा पुढाकारअहेरी : जगद्गुरू श्री नरेंद्राचार्य महाराज यांच्या ५० व्या जन्मोत्सवानिमित्त जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज संप्रदाय तालुका अहेरीच्या वतीने रविवारी येथील उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या १७ जवानांसह एकूण १०० जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. या शिबिराचे उद्घाटन अहेरीचे माजी आ. दीपक आत्राम यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. चे कृषी सभापती अजय कंकडालवार होते. प्रमुख अतिथी म्हणून सीआरपीएफ ३७ बटालियनचे कमांडंट श्रीराम मिना, सीआरपीएफ क्रमांक ९ बटालियनचे द्वितीय कमान अधिकारी लव कुमार, अहेरीचे पोलीस निरीक्षक संजय मोरे, महेश मुक्कावार, मोनेश्वर हडपे, प्रोटोकॉल अधिकारी केशव बोेराडे आदी मान्यवर उपस्थित होते. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या ५० व्या जन्मोत्सवानिमित्त १ लाख बॉटल रक्त संकलन करण्याचा कार्यक्रम राज्यभरात सुरू आहे. यापैैकी ५० हजार बॉटल रक्त भारतीय सैन्यांसाठी तर ५० हजार बॉटल रक्त महाराष्ट्र शासनाकडे देण्यात येणार आहे. माजी आ. दीपक आत्राम यांच्यासह सर्वच उपस्थित मान्यवरांनी या रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याबाबत नरेंद्राचार्य संप्रदायाच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याने ते प्रत्येकाने करावे, असे सांगून मतदानाचे महत्त्व पटवून दिले. सदर रक्तदान शिबिरात सीआरपीएफ क्रमांक ९ बटालियनचे द्वितीय कमान अधिकारी लव कुमार यांनीही रक्तदान केले. कार्यक्रमाचे संचालन श्री नरेंद्रचार्य महाराज संप्रदायाचे अहेरी तालुका अध्यक्ष विजय खरवडे यांनी केले तर आभार प्रा. डॉ. पी. एल. ढेंगळे यांनी मानले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी नगरसेविका वर्षा ठाकरे, डॉ. निलिमा सिंह, जिल्हा निरीक्षक टी. एन. शेळके, रवींद्र ठाकरे, दिगू खतवार, प्रभाकर डोंगरे, दिवाकर मुक्के, यशवंत चंद्रगिरीवार, खाताळ, रक्त संक्रमण विभागाचे डॉ. बिश्वास, सरिता वाघ, शिरीन कुरेशी, गोपाल महतो, शरद बांबोळे आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)