शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
2
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
3
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
4
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
5
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
6
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
7
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
8
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
9
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
10
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
11
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
12
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
13
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
14
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
15
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
16
छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवाद्यांचा खात्मा; पीएम नरेंद्र मोदींनी केले सुरक्षा दलांचे कौतुक; म्हणाले...
17
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
18
'जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलाय', 'त्या' आरोपांवरून भारताने तिखट शब्दात सुनावले
19
MI vs DC : अक्षर पटेल का नाही?; फाफ म्हणाला. मागच्या दोन दिवसांपासून तो....
20
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू

बिनगुंडा गावाला जवानांचा वेढा, गडचिरोलीत घातपाताचा कट रचणारे पाच जहाल माओवादी ताब्यात

By संजय तिपाले | Updated: May 20, 2025 15:59 IST

तीन महिलांचा समावेश; ३६ लाखांचे होते बक्षीस

संजय तिपाले, गडचिरोली: जवानांविरुद्ध घातपाताचा कट रचणाऱ्या पाच जहाल माओवाद्यांना २० मे रोजी भामरागडच्या बिनागुंडा गावातून ताब्यात घेतले. यात तीन महिला माओवाद्यांचा समावेश असून त्यांना अटक केली आहे तर दोघांची कसून चौकशी सुरू आहे. अटकेतील तिघीही छत्तीसगड राज्यातील आहेत. पाच जणांवर मिळून ३६ लाखांचे इनाम होते.

माओवाद्यांच्या प्लाटून क्र. ३२ ची विभागीय समितीची सदस्य  उंगी मंगरु होयाम ऊर्फ सुमली  (२८, रा. पल्ली, ता. भैरमगड, जि. बिजापूर), प्लाटून क्र. ३२ ची कमांडर पल्लवी केसा मिडीयम ऊर्फ बंडी (१९,  रा. कोंचल, ता. आवापल्ली  जि. बिजापूर),  प्लाटून क्र. ३२ ची सदस्य देवे कोसा पोडीयाम ऊर्फ सबिता (१९ , रा. मारोट बाकापंचायत ता. आवापल्ली, जि. बिजापूर ) यांचा समावेश आहे.  एक स्वयंचलित एसएलआर रायफलसह एक ३०३ रायफल, तीन एसएसआर रायफल, दोन भरमार असे एकूण ७ हत्यार (अग्निशस्त्रे) जप्त करण्यात आले आहेत.

लाहेरी उप पोलिस ठाणे हद्दीत ५० वर माओवादी तळ ठोकून बसले असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक यतीश देशमुख, एम. रमेश, श्री. सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली नक्षलविरोधी अभियानचे उपअधीक्षक विशाल नागरगोजे हे सी - ६० चीसात पथके , केंद्रीय राखीव दलाचे जवान यांच्यासह मोहिमेवर रवाना झाले.

... म्हणून केला नाही गोळीबार

२० मे रोजी सकाळी संपूर्ण गावाला जवानांनी घेरले. हिरवे - पिवळे गणवेश असलेल्या पाच संशयितांना शिताफीने पकडले. गावकऱ्यांना धोका पोहोचू नये म्हणून गोळीबार न करता जवानांनी मोहीम राबवली. यावेळी काही माओवादी पळून गेले. तिघींना अटक केली असून इतर दोघांच्या वयाबाबत ठोस पुरावे नसल्याने खातरजमा करण्यात येत आहे.

कोणावर किती बक्षीस?

१०३ माओवाद्यांना २०२२ पासून आतापर्यंत जवानांनी अटक केली आहे. विभागीय समितीची सदस्य उंगी मंगरु होयाम ऊर्फ सुमलीवर महाराष्ट्र शासनाचे १६ लाख, कमांडर पल्लवी केसा मिडीयम ऊर्फ बंडी ८ लाख व  सदस्य देवे कोसा पोडीयाम ऊर्फ सबिता (१९ , रा. मारोट बाकापंचायत ता. आवापल्ली, जि. बिजापूर ) हिच्यावर चार लाख रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आलेले होते.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी