किटाळीत होणार सोय : खासदारांच्या हस्ते कामाचा शुभारंभलोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : तालुक्यातील किटाळी येथे खा. अशोक नेते यांच्या हस्ते सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.भूमिपूजनप्रसंगी डॉ. भारत खटी, भाजप महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष रेखा डोळस, सरपंच हरी भोयर, गोपाल भांडेकर, लालाजी कुकुडकर, डी. जी. गावीत, रोशनी बैस, धुरंधर सातपुते, राम लांजेवार, गंगाधर कुकडकर, अमर बोबाटे, लोमेश बांडे, प्रशांत चहांदे, प्रितम इरमलवार, जावेदअली उपस्थित होते. किटाळी टोला येथे वाढीव विद्युत खांब, पाण्याची टाकी, अंगणवाडीची निर्मिती करावी, अशी मागणी यावेळी खासदारांकडे नागरिकांनी केली असता, गावातील विविध समस्या सोडवून सुविधा पुरविण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन खा. अशोक नेते यांनी दिले. दरम्यान खा. अशोक नेते यांनी व्यस्त कार्यक्रमातही गावातील अनेक समस्या जाणून घेतल्या व गावातील नागरिकांशी संवाद साधला.
सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन
By admin | Updated: May 9, 2017 00:49 IST