शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
2
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
3
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
4
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
6
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
7
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
8
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
9
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
10
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
11
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
12
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
13
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
14
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
15
बांगलादेशी खासदाराला अडकविले हाेते हनी ट्रॅपमध्ये; हत्येसाठी मित्रानेच दिली ५ कोटींची सुपारी
16
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
17
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
18
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
19
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
20
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य

भामरागड प्रकल्प ठरला क्रीडा संमेलनाचा बाजीगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:13 AM

आदिवासी विकास नागपूर विभागाच्या तीन दिवशीय क्रीडा संमेलनाचा सोमवारीं समारोप झाला. यात भामरागड प्रकल्पाने विजेते पद प्राप्त केले. विशेष म्हणजे, भामरागड प्रकल्प सलग ११ वेळा विभागीय स्पर्धांचा विजेता ठरला आहे.

ठळक मुद्देदेवरी प्रकल्पाला उपविजेतेपद : सलग ११ वेळा भामरागडची चमू ठरली विजेती; आश्रमशाळांच्या संमेलनाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदिवासी विकास नागपूर विभागाच्या तीन दिवशीय क्रीडा संमेलनाचा सोमवारीं समारोप झाला. यात भामरागड प्रकल्पाने विजेते पद प्राप्त केले. विशेष म्हणजे, भामरागड प्रकल्प सलग ११ वेळा विभागीय स्पर्धांचा विजेता ठरला आहे. नक्षलग्रस्त भागातील या विद्यार्थ्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. या सामन्यांमध्ये देवरी प्रकल्प उपविजेता ठरला आहे.पारितोषीक वितरण कार्यक्रमाला आमदार डॉ. देवराव होळी, नागपूर विभागाच्या अप्पर आयुक्त डॉ. माधवी खोडे, उपआयुक्त सुरेंद्र सावरकर, सहायक जिल्हाधिकारी तथा गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, नगराध्यक्ष योगीता पिपरे, सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा, नगरसेवक प्रमोद पिपरे, नगरसेविका लता लाटकर, चिमूरचे प्रकल्प अधिकारी केशव बावणकर, देवरीचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी, भंडाराचे प्रकल्प अधिकारी पी. पृथ्वीराज, भामरागडचे प्रकल्प अधिकारी निरज मोरे, नागपूरचे पीओ दिगंबर चव्हाण, सहायक आयुक्त दीपक हेडाऊ, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रदीप शिंदे, सहायक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार उपस्थित होते. क्रीडा संमेलनाचे अहवाल वाचन प्रकल्प अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले. संचालन अनिल सोमनकर तर आभार उपआयुक्त सुरेंद्र सावरकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी लेखाधिकारी किशोर वाढ, कार्यालय अधीक्षक डी. के. टिंगुसले, सहायक प्रकल्प अधिकारी ए. आर. शिवणकर, आर. के. लाडे, डब्ल्यू. टी. राऊत, छाया घुटके, क्रीडा अधिकारी मदन टापरे, क्रीडा समन्वयक संदीप दोनाडकर, सुधाकर गौरकार, सुधीर शेंडे, विनोद कुलकर्णी, व्ही. वाय. भिवगडे, जे. एन. नैताम, डब्ल्यू. के. कोडाप, नोडल अधिकारी आर. टी. निंबोडकर, डी. व्ही. विरूटकर, सुभाष लांडे, संदीप भोयर, भास्कर मदनकर यांनी सहकार्य केले.गडचिरोली प्रकल्प तिसरागडचिरोली येथील क्रीडा संमेलनाचे आयोजन प्रथमच राज्यस्तरीय क्रीडा संमेलनाच्या दर्जाप्रमाणे होते. या स्पर्धेत गडचिरोली प्रकल्पाने तिसरे स्थान पटकाविले. भामरागड हा अतिशय दुर्गम व नक्षलग्रस्त तालुका असतानाही येथील विद्यार्थ्यांनी सलग ११ वेळा विजेतेपद पटकाविल्याने मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले.