शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
3
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
4
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
5
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
6
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
7
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
8
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
9
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
10
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
11
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
12
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
13
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
14
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
15
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
16
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
17
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

एड्सपासून दूर राहण्यासाठी काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 12:09 AM

युवक, युवतींचे लग्न जुळविताना संबंधित उपवर-वधू व त्यांचे कुटुंबीय सर्व प्रकारची माहिती घेतात, मात्र एचआयव्हीची तपासणी करीत नाही. त्यामुळे लग्नानंतरच्या जीवनात एड्सपासून धोका होऊ शकतो, .....

ठळक मुद्देन्या. संजय मेहरे यांचे आवाहन : जागतिक एड्स दिनानिमित्त शहरात निघाली जनजागृती रॅली

ऑनलाईन लोकमत गडचिरोली : युवक, युवतींचे लग्न जुळविताना संबंधित उपवर-वधू व त्यांचे कुटुंबीय सर्व प्रकारची माहिती घेतात, मात्र एचआयव्हीची तपासणी करीत नाही. त्यामुळे लग्नानंतरच्या जीवनात एड्सपासून धोका होऊ शकतो, त्यामुळे लग्नापूर्वी युवक-युवतींनी एचआयव्ही तपासणी करणे गरजेचे आहे. तसेच रक्तदान करताना एचआयव्ही एड्सची तपासणी करावी, एड्सपासून दूर राहण्यासाठी तरूण वयात काळजी घेणे आवश्यक आहे. शिवाय तंबाखू, खर्रा, बिडी, सिगारेट व इतर व्यसनांपासून युवकांनी दूर राहिले पाहिजेत. आपल्याला दुर्धर आजार होऊ नये, यासाठी युवक, युवतींनी सतर्क राहावे, असे आवाहन गडचिरोलीचे जिल्हा सत्र न्या. संजय मेहरे यांनी केले.जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधन पथक व जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोलीच्या वतीने जागतिक एड्स दिनानिमित्त गुरूवारी सकाळी शहरात एड्स जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. न्या. संजय मेहरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. पी.बी. पाटील यांच्या हस्ते रॅलीला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. शैलेजा मैंदमवार, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सचिन हेमके, महिला रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपचंद सोयाम, एआरटीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप मडावी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी महेश भांडेकर, प्रकल्प संचालक कबीर निकुरे आदी उपस्थित होते.यावेळी जिल्हा सत्र न्या. संजय मेहरे यांनी एचआयव्ही एड्समुळे तरूण वयात असणारे धोके व त्यापासून होणारे परिणाम याबाबत अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन केले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. खंडाते यांनी एचआयव्ही एड्सविषयी अंधार दूर करण्यासाठी १०९७ या टोल फ्री नंबरचा वापर एचआयव्ही एड्स संबंधी सर्व माहिती मिळविण्यासाठी कसा करावा, याबाबतची माहिती दिली. त्यानंतर सर्व मान्यवरांनी मोफत एचआयव्ही तपासणीकरिता जवळच्या आयसीटीसी सेंटरला भेट देऊन चाचणी करण्याबाबत जनतेला आवाहन केले. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे यांनी जिल्हा व तालुकास्तरावरील एचआयव्ही एड्सबाबत जनजागृती पंधरवड्यात राबवियात येणाºया विविध कार्यक्रमाविषयी यावेळी माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन सविता वैद्य यांनी केले तर आभार जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सचिन हेमके यांनी मानले.यशस्वीतेसाठी मुकेश वरदाळकर, नीलेश चोपडे, श्रीकांत मोडक, राजेश गोंडाने, किशोर रामटेके, शेषराव खोब्रागडे, राजेंद्र फटींग, धीरज इंगले, कल्पना धाबेकर, बंडू कुंभरे आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाला रेड रिबिल क्लब गडचिरोली, एनएसएस, स्काऊड गाईड पथक व शासकीय संस्था, जिल्हा समादेश, प्राध्यापक, शिक्षक तसेच शासकीय परिचर्या प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी, शहरातील शाळांचे विद्यार्थी हजर होते.