शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

रिक्तपदांमुळे विकासात रोडा

By admin | Updated: August 31, 2014 23:48 IST

जिल्ह्यात एकूण मंजूर असलेल्या २३ हजार ६२३ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदापैकी २१ हजार २१० पदे भरण्यात आली असून सुमारे २ हजार ४१३ पदे रिक्त आहेत. यामध्ये वर्ग अ च्या कर्मचाऱ्यांचे

गडचिरोली : जिल्ह्यात एकूण मंजूर असलेल्या २३ हजार ६२३ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदापैकी २१ हजार २१० पदे भरण्यात आली असून सुमारे २ हजार ४१३ पदे रिक्त आहेत. यामध्ये वर्ग अ च्या कर्मचाऱ्यांचे सुमारे १७६ पदे रिक्त आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्यात फार मोठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे सदर पदे तत्काळ भरण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त व आदिवासी बहुल असल्याने केंद्र व राज्य शासनाकडून कोट्यावधी रूपयाचा निधी प्राप्त होतो. जवळपास १ हजार ३०० गावांमध्ये पेसा कायदा लागू आहे. या कायद्यान्वये या भागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त ठेवण्यावर बंदी असली तरीही याही गावांमधील अनेक पदे रिक्त आहेत. संपूर्ण जिल्ह्याचे प्रशासन ज्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फतीने चालविले जाते त्या कार्यालयातील सुमारे ११७ पदे रिक्त आहेत. अधीक्षक भूमीअभिलेख कार्यालयातील २५८ पदांपैकी १६४ पदे भरण्यात आली असून ९४ पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषदेंतर्गत ८ हजार ७१४ पदे मंजूर आहेत. त्यापैकी सुमारे ४९४ पदे रिक्त आहेत. महत्वाचे म्हणजे गट अ च्या १६१ पदांपैकी केवळ ८७ पदे भरण्यात आली असून ७४ पदे रिक्त आहेत. रिक्तपदांचे हे प्रमाण ४५.९६ टक्के एवढे आहे. गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादाची समस्या आहे. यासाठी इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पोलिसांची संख्या जास्त आहे. पोलिसांचा नक्षल्यांशी सामना असल्याने येथील पोलिसाची नोकरी अत्यंत धोकादायक मानल्या जाते. मात्र सदर विभागसुद्धा रिक्त पदांपासून सुटलेला नाही. याही विभागातील सुमारे १६३ पदे रिक्त आहेत. जिल्हा समादेशक, होमगार्ड कार्यालयातील ६ पदे रिक्त आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील ५९३ पदांपैकी ४०८ पदे भरण्यात आली आहेत. तर सुमारे १८६ पदे रिक्त आहेत. सामान्य रूग्णालयाच्या अंतर्गत येत असलेल्या दवाखान्यांमध्ये सुमारे ७७७ पदे मंजूर आहेत. त्यापैकी २०९ पदे रिक्त आहेत. रिक्तपदांचे प्रमाण २६.९० टक्के एवढे आहे. जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयातील ७१ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांपासून एकही कार्यालय सुटलेले नाही. जिल्ह्यात बहुतांश अधिकारी काम करण्यास तयार होत नाही. त्यामुळे बदली होताच ते निघून जातात. त्यांच्या जागेवर दुसरा अधिकारी व कर्मचारी येण्यास तयार होत नाही. त्यामुळे रिक्त पदांची संख्या वाढतच चालली आहे. बहुतांश अधिकाऱ्यांना सजा म्हणून गडचिरोली जिल्ह्यात पाठविले जाते. सदर अधिकारी काही दिवस काढायचे आहेत. याच मानसिकतेने काम करतात. त्यामुळे येथील समस्या मार्गी लागत नाही. व केंद्र शासनाकडून तसेच राज्य शासनाकडून प्राप्त झालेला निधी खर्च होत नाही. ग्रामीण भागाच्या विकासाची धुरा सांभाळणाऱ्या ग्रामसेवक, तलाठी व शिक्षक पदे यापासून सुटलेली नाही. एका ग्रामसेवकाकडे २ ते ३ ग्रामपंचायतीचा प्रभार सोपविण्यात आला आहे. तर काही शाळांमध्ये केवळ एकच शिक्षक कार्यरत आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी कोट्यवधी रूपयाचा निधी उपलब्ध करून दिला जात असला तरी प्रशासकीय यंत्रणेमध्ये अधिकारी व कर्मचारीच नसल्याने सदर निधी दरवर्षीच वापर जात आहे. (प्रतिनिधी)