शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
4
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
5
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
6
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
7
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
8
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
9
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
10
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
11
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
12
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
13
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
14
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
15
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
16
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
17
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
18
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
19
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
20
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध

३९.४५ कोटींचे शिलकी अंदाजपत्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 6:00 AM

नगर परिषदेमार्फत शहर विकासाच्या विविध योजना राबविल्या जातात. या योजना अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आकारास येत असल्याने नगर परिषदेमार्फत सादर करण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पाकडे शहरवासीयांचे लक्ष लागले राहते. २०१७-१८ पर्यंत १०० कोटी रुपयांपेक्षा कमी निधीचा बजेट सादर केला जात होता. मात्र २०१८-१९ पासून त्यात वाढ झाली आहे.

ठळक मुद्देगडचिरोली नगर परिषद : १३८ कोटी ७९ लाखांच्या खर्चाचे नियोजन सादर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली नगर परिषदेच्या आर्थिक वर्ष २०२०-२१ मधील १७८ कोटी ४ लाख रुपयांच्या बिग बजेटचे सादरीकरण बुधवारी (दि.२७) नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी केले. यात वर्षभरात १३८ कोटी ७९ लाख रुपयांच्या खर्चातून विविध कामांसाठी तरतूद करण्यात आली, तर ३९ कोटी ४५ लाख रुपये शिल्लक राहणार आहे. या अंदाजपत्रकाला नगर परिषदेच्या विशेष सभेत मंजुरी देण्यात आली.नगर परिषदेमार्फत शहर विकासाच्या विविध योजना राबविल्या जातात. या योजना अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आकारास येत असल्याने नगर परिषदेमार्फत सादर करण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पाकडे शहरवासीयांचे लक्ष लागले राहते. २०१७-१८ पर्यंत १०० कोटी रुपयांपेक्षा कमी निधीचा बजेट सादर केला जात होता. मात्र २०१८-१९ पासून त्यात वाढ झाली आहे. २०१८-१९ मध्ये १२७ कोटी, २०१९-२० मध्ये १८३ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. २०१९-२० च्या तुलनेत २०२०-२१ मधील अर्थसंकल्प जवळपास पाच कोटी रुपयांनी कमी आहे. मात्र मागील दोन वर्षांच्या तुलनेत निधीत वाढ झाली असल्याने याला बिगबजेट अर्थसंकल्प मानले जात आहे.नगर परिषदेला विविध माध्यमातून असलेले कर वसुलीचे अधिकार व नगर परिषदेची स्वत:ची साधने यांच्यामार्फत २०२०-२१ या वर्षात १९ कोटी ६३ लाख रुपये जमा होतील. ५ कोटी ३९ लाख रुपये जुने शिल्लक असे एकूण २५ कोटी २ लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. नगर परिषदेला प्राप्त झालेले उत्पन्न विविध घटकांवर खर्च करावे लागते. २०२०-२१ या वर्षात नगर परिषद २५ कोटी १ लाख रुपये खर्च करेल, अशी अपेक्षा आहे. शासनाच्या विविध योजनांमार्फत २०२०-२१ या वर्षात ५६ कोटी २३ लाख रुपये प्राप्त होतील, अशी अपेक्षा आहे. प्रारंभीची शिल्लक ६२ कोअी २३ लाख रुपये आहे. वर्षाखेर नगर परिषदेकडे शासनाच्या योजनांच्या माध्यमातून ११८ कोटी रुपये जमा होतील, अशी अपेक्षा आहे. प्राप्त निधीपैकी ८६ कोटी रुपये खर्चुन ३२ कोटी रुपये शिल्लक राहतील, अशी अपेक्षा आहे.पाणीपट्टीत २०० रुपये वाढपाणीपट्टीत किती टक्के होणार आहे, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले होते. अंदाजपत्रकात २०० रुपये वाढ दर्शविण्यात आली आहे. यापूर्वी प्रती जोडणी/प्रती वर्ष १ हजार ३०० रुपये आकारले जात होते. आता पाणीपट्टी कर १ हजार ५०० रुपये करण्यात आला आहे.गडचिरोली शहराची पाणी पुरवठा योजना २० वर्ष जुनी आहे. नदीवर एकच पंप आहे. त्याचीही क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे नदीवर दोन पंप बसविणे आवश्यक आहे. त्यासाठी ४० लाख रुपयांचा खर्च येणार आहे. तसेच पाईपलाईन जुनी असल्याने वेळोवेळी बिघाड निर्माण होते. सदर पाईपलाईनही दुरूस्ती करावी लागणार आहे. वाढीव वस्त्यांमध्ये पाईपलाईन टाकली जात आहे. तसेच दोन पाण्याच्या टाक्या बांधल्या जात आहेत. त्यामुळे पाणी पुरवठा वाढणे आवश्यक झाले आहे. प्रतीवर्षी २०० रुपये जरी वाढ करण्यात आली असली तरी शुध्द व पुरेसे पाण्याचे महत्त्व लक्षात घेता ही वाढ फार नाही. वाढलेल्या निधीतून पुरेसे व शुध्द पाणी देण्याचा नगर परिषदेचा प्रयत्न राहणार आहे. शहरातील सर्वच वर्गाचा विचार करून अर्थसंकल्प सादर केला आहे.- योगीता पिपरे, नगराध्यक्ष, नगर परिषद गडचिरोलीमुलांसाठी २० लाखांची खेळणीयावर्षीच्या अंदाजपत्रकात अंगणवाड्यांमधील मुलांसाठी २० लाख रुपयांची खेळणी खरेदी केली जाणार आहेत. तसेच ७ लाख रुपयांच्या गार्डन चेअर घेतल्या जाणार आहेत. मोकाट जनावरे पकडण्यावरील खर्च दुप्पट करण्यात आला असून त्यावर २० हजार रुपयांची तरतूद केली आहे.शहरातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. पाईपलाईन लिकेज असल्यामुळे अशुध्द पाण्याचा पुरवठा होतो. तरीही नगर परिषदेने २०० रुपये वाढ केली आहे. हा निर्णय अन्यायकारक आहे. नगर परिषदेचे स्वत:चे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न दिसून येत नाही. आर्थिक व दुर्बल घटकांसाठी ५ टक्के तरतूद अर्थसंकल्पात करायची असताना सुध्दा अर्थसंकल्पात या घटकासाठी निधी राखून ठेवण्यात आला नाही. गटार लाईनसाठी प्राप्त झालेले पाच कोटी रुपये अजुनही अ‍ॅक्सिस बँकेतच आहेत. सदर पैसे फिक्स केले असते तर अधिक व्याजदर मिळाला असता.-सतीश विधाते, नगरसेवकमागील वर्षाचे अर्थसंकल्पीय टाळेबंद पत्रक दिले नाही. २०२०-२१ या वर्षाचे अंदाजपत्रक १७८ कोटी रुपयांचे दाखविले आहे. मात्र शासनाकडून निधी प्राप्त होणार नाही. त्यामुळे केवळ फुगवटा असलेला अर्थसंकल्प आहे.-रमेश चौधरी, नगरसेवक

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका