शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

आजारी युवतीला तपासताना 'बॅड टच', आलापल्लीचा डॉक्टर गजाआड

By संजय तिपाले | Updated: November 27, 2023 17:15 IST

विनयभंग व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा नोंद

गडचिरोली : आजारी असल्याने उपचारासाठी आलेल्या अल्पवयीन युवतीला 'बॅड टच' केल्याच्या आरोपावरुन एका खासगी डॉक्टरवर गुन्हा नोंद झाला. अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथे २६ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. पोलिसांनी संबंधित डॉक्टरला जेरबंद केले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, संतोष मदेर्लीवार असे त्या डॉक्टरचे नाव आहे. आलापल्लीत त्याचा खासगी दवाखाना आहे. अहेरी तालुक्यातील १७ वर्षीय युवती २६ नोव्हेंबरला दुपारी त्याच्या दवाखान्यात उपचारासाठी आली. यावेळी एक रुग्ण महिला बाहेर बसलेली होती. दालनात तपासणीसाठी गेल्यावर डॉ.संतोष मदेर्लीवारने 'बॅड टच' केला, असा आराेपी युवतीने केला. नातेवाईकांसह तिने अहेरी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरुन रात्री विनयभंग व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा नोंद झाला. पोलिस निरीक्षक मनोज काळबांडे यांनी तपासचक्रे फिरवून तातडीने डॉ. संतोष मदेर्लीवारला अटक केली.

न्यायालयीन कोठडीत रवानगी

दरम्यान, २७ नोव्हेंबरला आरोपी डॉ. संतोष मदेर्लीवारला पोलिसांनी अहेरी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली. अधिक तपास सुरु असल्याचे पोलिस निरीक्षक मनोज काळबांंडे यांनी 'लोकमत'ला सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगdoctorडॉक्टरGadchiroliगडचिरोली