कोरोना संसर्ग टाळण्यासाठी गर्दी जमणारे कार्यक्रम टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 06:00 AM2020-03-14T06:00:00+5:302020-03-14T06:00:36+5:30

जिल्ह्यातील विविध यात्रा, महोत्सव, उर्स यांच्या आयोजकांनी कोरोना संसर्गाबाबत विशेष काळजी घ्यावी. त्यांनी अशा कार्यक्रमांचे आयोजन न करता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सिंगला यांनी केले. आपणाला यात्रा पुढील वर्षीही साजरा करता येते. तेव्हा ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे, असे कार्यक्रम टाळावेत, असे त्यांनी यावेळी सांगितले.

Avoid crowding events to prevent corona infection | कोरोना संसर्ग टाळण्यासाठी गर्दी जमणारे कार्यक्रम टाळा

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी गर्दी जमणारे कार्यक्रम टाळा

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : भीती न बाळगता काळजी घ्या

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : देशासह संपूर्ण जगात कोरोना विषाणूमुळे भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. या संसर्गाबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रशासनाकडून राबविल्या जात आहेत. नागरिकांनी गर्दी जमणारे कार्यक्रम टाळावे, असा सल्ला जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. तसेच भीती न बाळगता स्वत: काळजी घेतल्यास या संसर्गापासून दूर राहता येईल, असेही जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी म्हटले आहे.
जिल्ह्यातील विविध यात्रा, महोत्सव, उर्स यांच्या आयोजकांनी कोरोना संसर्गाबाबत विशेष काळजी घ्यावी. त्यांनी अशा कार्यक्रमांचे आयोजन न करता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सिंगला यांनी केले. आपणाला यात्रा पुढील वर्षीही साजरा करता येते. तेव्हा ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे, असे कार्यक्रम टाळावेत, असे त्यांनी यावेळी सांगितले. लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी यांनी यापुढे गर्दी होईल असे कार्यक्रम, शुभारंभ कार्यक्रम टाळावेत असे जिल्हाधिकारी यांनी आवाहन केले आहे.
जिल्ह्यातील यात्रा आयोजित करणाºया एजन्सी, स्थानिक ट्रॅव्हलर्स यांनी यात्रांचे आयोजन तूर्तास टाळावे. तसेच जे पर्यटक परदेशी किंवा इतर ठिकाणी पाठविले आहेत त्यांच्याबाबतही काही आवश्यक माहिती असल्यास जिल्हा प्रशासनाला कळवावी. जिल्ह्यात विलगीकण व क्वॉरंटाईनची सुविधा गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आली आहे. कोरोना बाबत लोकांना माहिती देण्यासाठी विविध माध्यमांचेही महत्त्व असून योग्य आणि अचूक माहिती देणे गरजेचे आहे, असे जिल्हाधिकाºयांनी म्हटले आहे.

स्वच्छता ठेवणे आवश्यक
कोरोना संसर्गापासून दूर राहण्यासाठी वैयक्तिकस्तरावर नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे. हात स्वच्छ धुणे, सार्वजनिक ठिकाणी जास्त वापरायच्या वस्तूंना स्पर्श न करणे, गर्दीचे ठिकाण टाळणे आदी बाबी आवश्यक आहेत, असे जिल्हा प्रशासनाने म्हटल आहे.

माहिती नियंत्रण कक्षाची स्थापना
गडचिरोली जिल्ह्यात परदेशातून किंवा परराज्यातून आलेली अथवा कोरोनाबाधित राज्यातून व्यक्ती आल्यास याबाबतची माहिती संबंधितांनी प्रशासनाला कळवावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली. कक्षाच्या ०७१३२-२२२३४० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे म्हटले आहे.

Web Title: Avoid crowding events to prevent corona infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.