खाेलीकरण केलेली माती तलावातच टाकली अस्ताव्यस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:38 AM2021-05-08T04:38:25+5:302021-05-08T04:38:25+5:30

आरमोरी तालुक्यातील सुकाळा, थोटेबोडी, मेंढेबोडी, मांगदा, शिवणी (चक) आदी गावतलावांचे खोलीकरण झाले; परंतु नियमाप्रमाणे माती तलावाच्या पाळीवर न टाकता ...

The augmented soil was thrown into the pond itself | खाेलीकरण केलेली माती तलावातच टाकली अस्ताव्यस्त

खाेलीकरण केलेली माती तलावातच टाकली अस्ताव्यस्त

Next

आरमोरी तालुक्यातील सुकाळा, थोटेबोडी, मेंढेबोडी, मांगदा, शिवणी (चक) आदी गावतलावांचे खोलीकरण झाले; परंतु नियमाप्रमाणे माती तलावाच्या पाळीवर न टाकता सदर माती रस्त्याच्या कडेला, कोणाच्याही शेतात, मोकळ्या जागेत टाकली जात आहे. सुकाळा येथील तलावाच्या खोलीकरणाची माती जंगलात टाकण्यात आली आहे. त्यामुळे जंगलाची मोठ्या प्रमाणात हानी हाेत आहे. जंगलात माती टाकण्याची लेखी परवानगी वनविभागाने दिलेली नाही. जिल्ह्यातील मामा तलावाची मालकी लघुसिंचन विभागाची असून, मुख्य कार्यपालन अधिकारी जि. प. गडचिराेली यांच्याकडून परवानगी घेऊन तलावाचे खोलीकरण केले जाते; पण खोलीकरणाची मातीही तलावाच्या पाठीवर टाकल्यास त्याचा फायदा तलावात अधिक पाणी साठवण्यासाठी झाला असता, लाखो रुपये खर्च करून उपसा केलेली माती अनावश्यक ठिकाणी टाकली जात आहे.

मेंढेबाेडी येथील तलावाची माती बाहेर टाकण्यात आली आहे. तलाव खोलीकरणाची माती बाहेर अस्ताव्यस्त न टाकता तलावाच्या पाळीवर टाकण्यात यावी. त्याचा अधिक फायदा पाणी साठवणुकीसाठी होईल, अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.

===Photopath===

070521\07gad_1_07052021_30.jpg

===Caption===

मेंढेबाेडी येथील तलावाची माती अशाप्रकारे तलावातच टाकली जात आहे.

Web Title: The augmented soil was thrown into the pond itself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.