शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

अकोल्यातून गडचिरोली जिल्ह्यात नकली नोटा पोहोचविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2022 05:00 IST

तिघेही ५० हजार रुपयांची कॅश घेऊन सतीशच्या कारने (क्र. एपी २८ डीएस ०००८) अकोल्याला गेले. तिथे संबंधित अज्ञात व्यक्तीशी त्यांचा संपर्कही झाला आणि त्या ५० हजार रुपयांच्या असली नोटांच्या बदल्यात त्या व्यक्तीने या तिघांना ३ लाखांच्या नकली नोटा दिल्या. पोलिसांनी जप्त केलेल्या नकली नोटांमध्ये १०० रुपयांच्या ९९५ नोटा आणि २०० रुपयांच्या ९९४ नोटा होत्या. नकली नोटांचा पुरवठा करणारी अकोल्यातील ती व्यक्ती कोण, याचाही शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : झटपट पैसे कमावण्याच्या नादात नकली नोटा चलनात आणण्यासाठी अकोला येथून घेऊन येणाऱ्या तीन आरोपींना तेलंगणातील महादेवपूर पोलिसांनी शनिवारी रंगेहाथ पकडले. यातील दोघे तेलंगणातील, तर एक आरोपी सिरोंचा येथील आहे. या नकली नोटा गडचिरोली जिल्ह्यात चलनात आणण्याचा त्यांचा डाव होता.प्राप्त माहितीनुसार, सिरोंचा तालुक्यालगत असलेल्या तेलंगणाच्या जयशंकर भूपालपल्ली जिल्ह्यातील बेगलूर गावात राहणाऱ्या सतीश सम्मय्या पोलू या शेती व्यवसाय करणाऱ्या युवकाला झटपट पैसे कमवायचे होते. महाराष्ट्रातील अकोला येथे एका व्यक्तीकडून नकली नोटा मिळतात अशी माहिती त्याला मिळाली होती. त्या नोटा आणून सिरोंचा तालुक्यातील ग्रामीण भागात त्या चलनात आणल्या जाऊ शकतात, असा त्याला विश्वास होता. त्यासाठी सतीश याने त्याच्याच गावातील सुरेश मल्ल्या एलुकुची याला सोबत घेऊन सिरोंचा येथील जयंत मांडवे याच्याशी संपर्क केला. मांडवे यालाही ही कल्पना आवडली.ठरल्यानुसार हे तिघेही ५० हजार रुपयांची कॅश घेऊन सतीशच्या कारने (क्र. एपी २८ डीएस ०००८) अकोल्याला गेले. तिथे संबंधित अज्ञात व्यक्तीशी त्यांचा संपर्कही झाला आणि त्या ५० हजार रुपयांच्या असली नोटांच्या बदल्यात त्या व्यक्तीने या तिघांना ३ लाखांच्या नकली नोटा दिल्या. पोलिसांनी जप्त केलेल्या नकली नोटांमध्ये १०० रुपयांच्या ९९५ नोटा आणि २०० रुपयांच्या ९९४ नोटा होत्या. नकली नोटांचा पुरवठा करणारी अकोल्यातील ती व्यक्ती कोण, याचाही शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले आहे.

१७०० च्या नकली नोटा मार्गातच चालविल्याअकोला येथून ३ लाख रुपयांच्या नकली नोटा घेतल्यानंतर तीनही आरोपी सिरोंचाच्या दिशेने निघाले. मार्गात त्यांनी त्या नकली नोटांमधूनच १७०० रुपये वापरून व्यवहारही केले. त्या नोटा सहजपणे चालल्याचे पाहून त्यांना नोटा कोणाला ओळखू येणार नाही, याबद्दल विश्वास निर्माण झाला.

अन् नकली नोटांचे बिंग फुटले३ लाखांपैकी १७०० रुपये खर्च झाल्यानंतर उर्वरित २ लाख ९८ हजार ३०० रुपयांच्या नकली नोटा घेऊन आरोपी तेलंगणातील आपल्या गावी बेगलूर येथे येणार होते. दोन दिवस गावात आराम केल्यानंतर या नोटा हळूहळू सिरोंचा तालुक्यात नेऊन चलनात आणू असा त्यांचा डाव होता; पण बेगलूर येथे पोहोचण्याआधीच कुडूरुपल्ली क्रॉस रोडवर महादेवपूर पोलिसांनी त्यांच्या वाहनांची तपासणी केली असता नोटांच्या बंडलचे कव्हर पोलिसांना दिसते. त्यामुळे सखोल तपासणीत ते पैसे नकली असल्याचे आढळले.

 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी