शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गुरांना वाचविण्याच्या प्रयत्नात तो स्वत:च झाला बिबट्याची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2021 11:37 IST

जंगलात नेहमीप्रमाणे गुरे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्याला बिबट्याने हल्ला करून ठार केले. ही घटना गुरुवारी दुपारी २:३० च्या सुमारास सिरोंचा तालुक्यातील तुमनूरजवळच्या जंगलात घडली.

ठळक मुद्देअनेक वर्षानंतर सिरोंचा तालुक्यात बिबट्याचा हल्ला

गडचिरोली : गावाजवळच्या जंगलात नेहमीप्रमाणे गुरे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्याला बिबट्याने हल्ला करून ठार केले. ही घटना गुरुवारी दुपारी २:३० च्या सुमारास सिरोंचा तालुक्यातील तुमनूरजवळच्या जंगलात घडली. विशेष म्हणजे सिरोंचा तालुक्यात गेल्या अनेक वर्षात वाघ किंवा बिबट्याचे अस्तित्व आणि हल्ल्याची घटना घडली नव्हती.

मलय्या बालय्या दुर्गम (वय ५०, रा. पेंटीपाक) असे मृत गुराख्याचे नाव आहे. मलय्या याच्यासह मृतेश पोचमा रामनेनी (वय ४८) हा देखील गुरे घेऊन गेला होता. दोघे एकामेकांपासून काही अंतरावर होते. याचवेळी झुडपातून आलेला एक बिबट्या कळपातील वासरावर झडप घेत असताना मलय्याला दिसला. तो वासराला वाचविण्यासाठी काठी घेऊन पुढे सरसावला, तितक्यात बिबट्याने वासराऐवजी मलय्यावर झडप घेतली व त्याला १०० मीटर अंतरावर फरफटत नेले. यामुळे जखमी झालेल्या मलय्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर बिबट्याने पुन्हा वासरावर हल्ला केला पण इतर गुरांमुळे बिबट्या वासराला मारू शकला नाही. 

सिरोंचा तालुक्यात जवळपास ५० वर्षांपूर्वी पेंटीपाका याच गावातील सुदुला मोंडी पोचम या व्यक्तीचा पट्टेदार वाघाशी मुकाबला झाला होता. त्यावेळी ३० वर्षीय सुदुलाने वाघाला हरवून पळवून लावले होते. तेव्हापासून सुदुलाला सर्वत्र 'शेरखान' या टोपणनावाने ओळखले जाते. आज या घटनेमुळे ८० वर्षाच्या शेरखानसह अनेकांनी त्या आठवणींना उजाळा दिला.

टॅग्स :Accidentअपघातleopardबिबट्याDeathमृत्यू